Crime News: गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 6 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याचं वृत्त आहे. इतकेच नव्हे तर, बलात्काराचा प्रयत्न करत नराधमांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकल्याचं निर्दयी कृत्य केलं आहे. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. तसेच, या हल्ल्यामुळे गंभीररित्या जखमी असलेल्या मुलीला राजकोटच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
6 वर्षांच्या मुलीला उचलून नेलं अन्...
पीडित मुलीचं कुटुंब हे राजकोटच्या अटकोट पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहतं. तसेच, शेतात काम करूनच कुटुंबियांना त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो. नेहमीप्रमाणे 4 डिसेंबर रोजी कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले असता, त्यांची 6 वर्षांची मुलगी तिथेच खेळत होती. दरम्यान, एक अज्ञात व्यक्ती पीडित मुलीचं तोंड दाबून तिला तिथून उचलून घेऊन गेला. त्यानंतर, आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिता सतत ओरडत असल्याकारणाने आरोपी ते करू शकला नाही.
हे ही वाचा: जालना : नायब तहसीलदारांच्या टेबलवर फेकले पैसे, लाच मागितल्याने हायहोल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
लैंगिक अत्याचार अन् गुप्तांगात रॉड...
त्यानंतर संतापलेल्या आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात रॉड घातला. शेवटी, आरोपी नराधम मुलीला रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिथेच सोडून फरार झाला. पीडित मुलगी बेपत्ता असल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही वेळानंतर, ती शेताच्या जवळच काही अंतरावर सापडली. पीडितेला गंभीर अवस्थेत पाहताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यावेळी, तिला उपचारांसाठी तातडीने राजकोटच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे ही वाचा: लोकसभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं अन् तुफान राडा, A to Z स्टोरी वाचा आणि क्रोनोलॅाजी घ्या समजून
पोलिसांचा तपास
संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्धा पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी पोलिसांची जवळपास 10 पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान, पोलिसांनी रामसिंह नावाच्या आरोपी व्यक्तीला अटक करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली.
ADVERTISEMENT











