Crime News: राजस्थानमधील जयपूरच्या मौखमपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील बाडूलाव गावात एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात शेतात अचानक लागलेल्या आगीमुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांना वाटलं की झोपडीला अचानक म्हणजेच अपघातातून आग लागली असावी, परंतु जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा यामागे प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
रात्री 11 वाजताच्या सुमारास, गावा बाहेर असलेल्या एका शेतात आगीचा धूर निघताना दिसला. गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एका मचानाजवळ आग लागलेली दिसली. ती आग विझवल्यानंतर त्यांना एक महिला आणि एक पुरूष आगीत गंभीररित्या भाजलेले आढळले. त्यानंतर, दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
महिला आणि पुरुष गंभीररित्या जखमी
मात्र, त्या आगीत भाजलेल्या दोन्ही पीडितांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, आमच्यावर पेट्रोल टाकून आम्हाला जाळण्यात आलं. या प्रकरणाबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. चौकशीतून आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीने सर्वच चकित झाले. सोनी गुर्जर आणि कैलाश गुर्जर अशी या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांची ओळख समोर आली.
नात्यातील तरुणासोबत प्रेमसंबंध अन्...
सोनी जवळपास सहा वर्षांपासून विधवा होती आणि दोन मुलांची आई होती. ती तिच्या दीर आणि चुलत सासऱ्यांसोबत राहत होती. केलाश हा त्यांच्याच कुटुंबातील एक नातेवाईक असून त्याचं सोनीच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. दरम्यान, सोनी आणि कैलाश दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर, ते बऱ्याचदा शेतावर भेटायला जात होते.
हे ही वाचा: “माहेरहून स्कॉर्पिओ आण नाहीतर...” हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण, वकीलाच्या बायकोचा 'त्या' अवस्थेत आढळला मृतदेह!
प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भयानक कट
सोनी वारंवार घराबाहेर जात असल्याकारणाने तिच्या दीर आणि सासऱ्यांना तिच्यावर संशय निर्माण झाला. त्यांनी सोनीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर, त्यांना लवकरच तिच्या प्रेमसंबंधाबद्दल कळालं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रेमसंबंध असल्याच्या रागातूनच त्यांनी सोनी आणि कैलाशची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या रात्री, सोनी आणि कैलाश नेहमीप्रमाणे शेतात एकत्र बसले होते. अचानक, महिलेचा दीर गणेश गुर्जर आणि सासरे बिरदीचंद गुर्जर तिथे आले. त्यांनी त्या दोघांना दोरीने बांधलं, त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर, आरोपी तिथून फरार झाले. आरोपी पळून गेल्यानंतर, गावकऱ्यांनी शेतातील आग विझवली आणि आगीत गंभीररित्या जखमी झालेल्या जोडप्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
हे ही वाचा: दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध! प्रेमसंबंधात आड येणाऱ्या पतीचा काढला काटा, प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...
पोलिसांची माहिती
हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात दोघांचं शरीर 90 टक्के भाजलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, हल्ल्यात वापरण्यात आलेलं पेट्रोल तसेच, शेतातून गोळा केलेले सायन्टिफिक पुरावे देखील तपासात समाविष्ट करण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अशा पद्धतीचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
ADVERTISEMENT











