शेतातून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग केला अन् वाटेत अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!

एका नवविवाहितेवर शेतात काम करणाऱ्या मजुराने बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे.

रस्त्यात अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!

रस्त्यात अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य! (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 12:20 PM • 03 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेतातून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग केला अन्...

point

वाटेत अडवून शेतात नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!

Crime News: मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका नवविवाहितेवर बलात्कार केल्याचं वृत्त आहे. एका महिलेने तिच्या शेतातील कामासाठी एका मजूराला कामावर ठेवलं होतं. घटनेच्या दिवशी, त्यांच्या शेतात काम सुरू होतं आणि त्यावेळी, शेतात महिलेसोबत तिची सासू सुद्धा उपस्थित होतं. अचानक सासूला एक काम आठवलं. तिने तिच्या सुनेला ते काम सांगितलं आणि सासूने तिला ते काम करण्यासाठी घरी जायला सांगितलं. सून घरी जात असताना, शेतातील तोच मजूर तिच्या मागे बाईकवरून गेला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने शेतातच महिलेवर बलात्कार केला.

हे वाचलं का?

घटनेनंतर, पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद घटनेबद्दल तिच्या सासूला सांगितलं. नंतर, दोघींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. दोघींच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी मजुराला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली. संबंधित घटना ही जैतपूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. पीडित महिला 22 वर्षांची असून तिचे लग्न एक वर्षापूर्वीच झालं होतं. तिचा नवरा कामानिमित्ताने दुसऱ्या राज्यात असून महिला तिच्या सासू-सासऱ्यांसोबत राहते. 

हे ही वाचा: ठाणे: "लग्न करण्यासाठी आधी 21 वर्षांचा हो..." कुटुंबियांचं बोलणं मनाला लागलं अन् 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!

बाईकवरून पीडितेचा पाठलाग केला अन्... 

पीडित महिलेने तक्रार करताना सांगितलं की, "मी माझ्या सासूसोबत शेतात काम करत होते. आम्ही शेतातील कामासाठी एका मजुराला कामावर ठेवलं होतं. शेतातील काम झाल्यानंतर, माझ्या सासूबाईंनी मला घरी जाण्यास सांगितलं. मी शेतातून घरी पायी जात असताना शेतातील मजूर बिन्नू बैगा त्याच्या बाईकवरून माझ्या मागे आला." 

शेतातच लैंगिक अत्याचार 

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीला रस्त्यात पाहताच पीडिता वेगात चालू लागली, पण त्याने तिचा पाठलाग केला आणि त्याने एका शेताच्या कडेला तिला रोखलं. पीडिता म्हणली की, "आरोपीने मला मागून पकडलं आणि जबरदस्तीने शेताकडे ओढत नेलं. त्यानंतर त्याने तिथेच माझ्यावर बलात्कार केला. मी मदतीसाठी ओरडले, पण जवळ कोणीच नव्हते. आरोपीने शेतातच माझ्यावर लैंगिक अत्याचार केला."

हे ही वाचा: मुंबईत रिक्षा चालकाचा 62 वर्षीय महिलेवर बलात्कार! अखेर, कोर्टाने सुनावली 'ती' शिक्षा अन्...

घटनेनंतर पीडिता तिच्या घरी गेली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या सासूला सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट जैतपूर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बिन्नू बैगाला अटक केली. आता या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 
 

    follow whatsapp