प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणीवर तब्बल 7 जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराकडून बळजबरीने पैसे हिसकावून घेतल्याचं वृत्त आहे.

7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार!

7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार!

मुंबई तक

• 10:34 AM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार!

point

बळजबरीने पैशांची मागणी अन्...

Crime News: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणीवर तब्बल 7 जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराकडून बळजबरीने पैसे हिसकावून घेतल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 19 फेब्रुवारी रोजी आसामच्या कछार जिल्ह्यातील सिलचर शहरात घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील पीडितेने पोलिसांकडे तिच्यासोबत घडलेल्या दृष्कृत्याची तक्रार केली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेने दोन आरोपींची ओळख पटवली असून त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा: NEET परीक्षा देऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी दबाव, मुलाने वडिलांना संपवलं, मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये भरले

7 पुरुषांकडून आळीपाळीने बलात्कार... 

या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सिलचर सदर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडितेची मेडिकल टेस्ट करण्यात आली असून तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सात अज्ञात पुरूषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि नंतर तिला एका आरोपीच्या खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आल्याचा पीडितेने आरोप केला आहे. 

हे ही वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपची बैठक, राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी? विनोद तावडे अन् आठवलेंबाबत मोठा निर्णय?

पीडितेच्या कुटुंबियांनी दिली माहिती 

पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या प्रियकरासह कारमधून फिरायला गेली होती आणि सिलचर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर बायपास रोडवर असताना एका एसयूव्हीमधून काही पुरुष आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी आधी त्यांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला आणि नंतर अचानक पीडितेसह तिच्या प्रियकराला पकडलं. तिथे सुमारे 7 पुरुष आणि त्यांनी तिच्या प्रियकराच्या समोर आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. 

    follow whatsapp