Crime News : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बछईपूर नावाच्या एका गावात जावयाने आपल्या सासरच्या घरी घुसून असं काही केलं की लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याने आपल्या बायकोची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर सासूचीही हत्या केली. दरम्यान, सासर्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपीने चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
ADVERTISEMENT
प्रेमविवाहानंतर वाढला दुरावा
अमित गुप्ता असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी प्रीती आणि सासू सुशीला देवी यांची निर्घृण हत्या केली आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अंतू गुप्ता (सासरे) यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत वाराणसीला हलवण्यात आले आहे. प्रीती आणि अमित यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत दिसत होते, पण कालांतराने नात्यात दुरावा वाढत गेला. लग्नानंतरही दोघांमधील वाद मिटला नाही आणि परिस्थिती सातत्याने बिघडत गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हे ही वाचा : मित्राच्या बायकोवर अन् मालकाच्या मुलीवर एकाच दिवशी बलात्कार, 19 वर्षीय राहुलने गाठला क्रूरतेचा कळस
अचानक सासरी पोहोचला अन्..
नुकतीच प्रीती आपल्या माहेरी येऊन राहत होती. काल (25 एप्रिल) रात्री आरोपी अमित अचानक सासरी पोहोचला. तो थेट खोलीत शिरला आणि पत्नीकडून मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. प्रीतीने विरोध केला असता अमितने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरडाओरडा ऐकून जेव्हा सासू आणि सासरे वाचवण्यासाठी आले, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रीती आणि सुशीला देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अंतू गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
हे ही वाचा : शौचालयास बसलेल्या नणंद-भावजयीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार, क्रूरतेची ओलांडली परिसिमा
सासऱ्यांची प्रकृती गंभीर
शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. गंभीर जखमी सासर्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लग्नानंतर अमित प्रीतीला आपल्या घरी न नेता दुसरीकडे घेऊन गेला होता आणि तिला मारहाण केली होती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
हे ही वाचा : डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम, मनसेची आक्रमक भूमिका; परप्रांतीय रिक्षाचालकांना काय दिला इशारा?
प्रीतीच्या बहिणीने सांगितला घटनाक्रम
प्रीती गेल्या 10 दिवसांपासून माहेरी राहत होती. मृत प्रीतीच्या बहिणीने सांगितले की, काल रात्री अमित चोरपावलांनी सासरी आला. तो थेट पत्नीच्या खोलीत शिरला आणि मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा प्रीतीने विरोध केला तेव्हा अमितने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. आरडाओरडा ऐकून आई-वडील वाचवायला आले असता, या माथेफिरूने त्यांनाही सोडले नाही. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवले असून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
ADVERTISEMENT











