'माझा नवरा तृतीयपंथी..' नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 11:02 AM)

Bihar News: लग्नाच्या नावाखाली एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. लग्नानंतर पीडितेला आपल्या नवऱ्याचे सत्य समजले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

माझा नवरा तृतीयपंथी..

point

नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट

point

नेमकं काय घडलं?

Bihar Crime News : लग्नाच्या नावाखाली कथित फसवणूक आणि छळाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने तिच्या पतीसह सासरच्या 11 लोकांविरुद्ध फसवणूक, हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत दिघवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

थाटामाटात लग्न पण...

पीडितेने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी तिचा विवाह शितलपूर नावाच्या एका गावात झाला होता. या लग्नात तिच्या वडिलांनी भेट म्हणून सहा लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि कपाटासह सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य दिले होते. लग्न थाटामाटात पार पडले तरी त्यानंतर पीडितेला जबरदस्त धक्का बसला.

हे ही वाचा : विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?

नवरा निघाला तृतीयपंथी

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला आपला पती ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) असल्याचे समजले, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे. जेव्हा तिने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा तिच्या पतीने तिला जीवे मारण्याची आणि तिचा मृतदेह माहेरी पाठवून देण्याची धमकी दिली. यानंतर सासरच्या मंडळींनी तिला सतत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळण्यास सुरुवात केली. पीडितेने कशीबशी ही सर्व हकीकत आपल्या माहेरच्या लोकांना फोनवरून सांगितली.

हे ही वाचा : NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कपड्यांसह साडेचार लाख रुपये

फसवणूक झाल्याचे समजताच जेव्हा पीडितेचे वडील आणि भाऊ तिला भेटण्यासाठी सासरच्या घरी पोहोचले, तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांना शिवीगाळ करत लाठीकाठ्या आणि शस्त्रांच्या जोरावर बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने या प्रकरणी पती संतोष कुमार महतो, सासरे मनोज महतो आणि सासू इंद्रवती देवी यांच्यासह एकूण 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 20 मार्च रोजी तिचे कपडे आणि साडेचार लाख रुपयांचे दागिने काढून घेऊन तिला घरातून हाकलून देण्यात आले. या संदर्भात दिघवारा पोलिसांनी तक्रार मिळाली असून, प्रकरणाचा तपास करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.