Crime News : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेयसीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत मुलगी दहावीची विद्यार्थिनी होती, तर आरोपी बारावीत शिकत आहे. या दोघांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती आणि त्याचे रूपांतर पुढे प्रेमात झाले होते. मात्र, या प्रेमसंबंधांचा शेवट अत्यंत भीषण झाला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
शाळा सुटल्यावर भेटायला बोलावले
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आरोपीवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आरोपीने 20 एप्रिल रोजी तिला शाळा सुटल्यानंतर एके ठिकाणी भेटायला बोलावले. तिथून त्याने तिला आपल्या दुचाकीवरून एका निर्जनस्थळी नेले. तिथे संधी साधून त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा कापू जीव घेतला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह एका कालव्याच्या जवळ असलेल्या झाडाझुडपात फेकून दिला.
हे ही वाचा : निवृत्त IPS अधिकारी घरी नव्हता, तिकडं पत्नीसोबत राहत्या घरात मोठं कांड..., नेमकं काय घडलं?
सडलेला मृतदेह, कपड्यांवरुन ओळख
मुलगी घरी न परतल्याने हताश झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून साडेसतरा वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने अखेर आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलेल्या ठिकाणावरुन पोलिसांनी कालव्याच्या झाडीतून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. अनेक दिवस मृतदेह उघड्यावर पडून राहिल्याने तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. अखेर कपड्यांवरून मुलीची ओळख पटवण्यात आली.
हे ही वाचा : Pune: तुरूंगातून बाहेर आला आणि 5 दिवसातच हत्या, तरूणीसोबत 'नको ते' करणं बेतलं जीवावर!
मुलीच्या वडिलांचा वेगळाच आरोप
या प्रकरणात मृत मुलीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले असून, त्यांची मुलगी घरातून निघताना सोबत लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन गेली होती, असा दावा त्यांनी केला आहे. आरोपीने हे दागिने आणि पैसे हडपण्यासाठीच मुलीची हत्या केल्याचा त्यांचा संशय आहे. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा होऊन त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ADVERTISEMENT











