Minor Girl Shocking Viral News : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील खीरी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या भाऊजींनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. पीडित मुलीला धमकी देऊन नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिता जेव्हा गर्भवती झाली, तेव्हा तिचा गर्भपात करण्यात आला. धक्कादायक म्हणजे तिला अॅसिड प्यायला दिलं. अॅसिड प्यायल्याने पीडित मुलीची तब्येत बिघडली आणि उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
त्या गावात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना मझगई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलंय, त्यांच्या मोठ्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सिसैया पुरवा गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत मुलीचं लग्न झालं होतं.
हे ही वाचा >> नाशिकमध्ये पूर.. धडकी भरवणारी दृश्य, पावसाचं थैमान! पुण्यातही पावसाचा धुमाकूळ
पण मागच्या वर्षी मुलीची तब्येत बिघडली, तेव्हा छोट्या मुलीला तिची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी पाठवलं. पण तेव्हा जावयाने तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ती जेव्हा घरी परतली, तेव्हा तिच्या पोटात वेदना झाल्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला चेकअपसाठी डॉक्टरकडे नेलं. तेव्हा अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये समजलं की, पीडित मुलगी गर्भवती आहे. जेव्हा मुलीला याविषयी विचारलं, तेव्हा तिने नराधम जावयाच्या संतापजनक कृत्याचा पर्दाफाश केला.
गुन्हा केल्याची नराधमाने दिली कबूली, पण नंतर..
पीडित मुलगी जेव्हा तिच्या बहिणीच्या सासरी गेली, तेव्हा नराधम भाऊजींनी तिच्यावर अत्याचार केल्याचं कबूल केलं नाही. पण पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचं म्हटलं, तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर कुटुंबियांनी निर्णय घेतला की, छोट्या मुलीचं लग्न तिच्या भाऊजीसोबत करायचं आणि तिला बहिणीसोबत एकाच घरात ठेवायचं.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ! इमारतीवरुन विद्यार्थीनीने मारली उडी; नेमकं कारण काय?
त्यानंतर मोठ्या मुलीचा तिच्या नवऱ्यासोबत वाद झाला आणि ती माहेरी निघून गेली. त्यानंतर संधीचा फायदा घेत कुटुंबियांनी छोट्या मुलीचा गर्भपात केला आणि औषध म्हणून तिला अॅसिड पाजलं. त्यानंतर पुन्हा त्या मुलीची तब्येत बिघडली. वडिलांनी तिची विचारपूस केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
