Crime News : छत्तीसगडच्या रायपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 70 वर्षीय वृद्ध वडिलांची त्यांच्याच पोटच्या मुलाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. संतु कोठरी असे मृत वृद्धाचे नाव असून, ते रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. या रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
दारुची पार्टी अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतु कोठरी यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. ते अनेकदा आपल्या घरीच ओळखीच्या लोकांना बोलावून दारूची पार्टी करत असत. वडिलांच्या या सवयीमुळे आणि घरात रोज होणाऱ्या दारूच्या पार्ट्यांमुळे त्यांचा मुलगा वीरेंद्र उर्फ राजू अत्यंत त्रस्त होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून पिता-पुत्रामध्ये कमालीचा ताणतणाव आणि वाद निर्माण होत होते.
हे ही वाचा : वाशीम : नगरपालिका देखल घेईना, बापाला मुलांसाठी ड्रेनेजमध्ये उतरण्याची वेळ
काठीने हल्ला आणि मृत्यू
घटनेच्या रात्रीही याच दारूच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात मुलाने घरात असलेली लाकडी काठी काढून आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. त्याने वडिलांच्या छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाकडाने इतके निर्घृण वार केले की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपी मुलाने मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि कोणालाही याची माहिती दिली नाही. अखेर स्थानिक नगरसेवकाला याबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा : 'तिनं 11 वर्ष सगळं सहन केलं..' सांगलीतील विवाहितेचा तमिळनाडूत मृत्यू
दारुच्या व्यसनाचे भयानक परिणाम
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुलगा वीरेंद्र याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घटनेच्या वेळी परिस्थिती नेमकी किती गंभीर होती याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने कौटुंबिक वाद आणि दारूच्या व्यसनाचे किती भयानक आणि गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पुन्हा एकदा समाजासमोर आणले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT











