13 वर्षीय मुलीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ, नराधमाचा मुलीवर पाशवी बलात्कार

मुंबई तक

• 07:50 PM • 07 Apr 2026

crime news : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका वृत्तमाध्यमानुसार, पोलिसांनी शनिवारी 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

point

पीडित मुलगी अंदाजे चार महिन्यांची गर्भवती

Crime News : झारखंडमधील गिरडीह येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका वृत्तमाध्यमानुसार, पोलिसांनी शनिवारी 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : धक्कादायक... डोसा खाल्ला अन् दोन छोट्या मुलींचा गेला जीव, आई-वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक

पीडित मुलगी अंदाजे चार महिन्यांची गर्भवती

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी अंदाजे चार महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीच्या पालकांच्या लक्षात आले की, पीडितेच्या शरीरात असामान्य बदल झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात भलताच संशय निर्माण झाल्याने त्यांनी तिची चौकशी केली, पीडितेनं तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सांगितली. तिने सांगितलं की, आरोपी व्यक्ती हे बऱ्याच काळापासून तिचा लैंगिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

पीडितेला वैद्यकीय उपचार सुरु

कुटुंबियांनी तात्काळपणे पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. गवान पोलीस ठाणे कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली. जयप्रकाश कुमार यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जात असून पीडितेला वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. 

हे ही वाचा : साखरपुड्याआधी तरुणी बॉयफ्रेंडसोबत झाली फिजिकल, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं...

आरोपीविरुद्ध विशिष्ट कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जाते. या घटनेनं समाजातील महिला आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सखोल तपास सुरु असून पीडितेला सर्वतोपरी मदत केली.