किरकोळ वादातून पंधरा दिवसांच्या बाळाची हत्या, बाळाच्या मावशीला देखील सोडलं नाही, आईने सांगितला घटनेचा थरार

Crime news : किरकोळ वादातून पंधरा दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. बळाचा मृतदेह घेऊन पोलिस नवगछिया उपविभागीय रुग्णालयात गेले. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:33 AM • 20 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईने सांगितला सांगितला घटनेचा थरार

point

बाळासह महिलेच्या बहिणीवर विटेने हल्ला करत संपवलं

Crime news : बिहारच्या भागलपूरमध्ये खारीक पोलिस ठाणे हद्दीत मन हेलावून टाकणारी घटना घडली. एका किरकोळ वादातून पंधरा दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. बळाचा मृतदेह घेऊन पोलिस नवगछिया उपविभागीय रुग्णालयात गेले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सासऱ्यासह चार बहिणींनी मिळून दाजीचं डोकंच ठेचलं.. थरकाप उडवेल अशी घटना!

आईने सांगितला सांगितला घटनेचा थरार

संबंधित प्रकरणात मृत बाळाच्या आईने घटनेचा थरार सांगितला की, मी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी होते. आमच्या कुटुंबातील  एका लहान मुलाने शेजारील घरावर चप्पल फेकली होती. त्याचं दिवशी मला शेजारी राहणाऱ्या जयहिंद पासवान नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केली होती. सर्वांनी समजूत घातली, पण तेव्हापासून ते मला शिवीगाळ करतात. मी घरात नव्हते तेव्हा माझं पंधरा दिवसांच बाळ पलंगावर एकटं होतं. 

खाली आलो तेव्हा जयहिंद पासवान बळाच्या खोलीतून पळ काढताना दिसला. तो मोबाईल विसरून तसाच बाहेर पळून गेला. बहीण गुडीया कुमारी आणि साक्षी कुमारी, आणि मी जयहिंदला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो तावडीत सापडला नाही. 

हे ही वाचा : मामीसोबत अनैतिक संबंध... बहिणीसोबत लग्न आणि सासू-मेव्हण्याची हत्या, पार चक्रावून टाकणारी कहाणी

महिलेच्या बहिणीवर विटेने हल्ला करत संपवलं

एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नसून महिलेच्या धाकट्या बहिणीवर देखील पासवानच्या बायकोने विटेने हल्ला केला होता, त्या हल्ल्यात लहान बहिणीचा देखील मृत्यू झाला. संबंधित प्रकरण पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    follow whatsapp