Crime News : छत्तीसगडमधील Janjgir-Champa जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एक महिला 29 सप्टेंबरच्या रात्री साधारण दीड ते दोन वाजताच्या दरम्यान आपल्या घरी जाण्यासाठी मदतीच्या शोधात होती. त्यावेळी काही तरुण तिच्याजवळ आले आणि मदत करण्याच्या बहाण्याने म्हणाले की, आम्ही तुला घरी सोडतो. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण हाच विश्वास तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खद प्रसंग ठरला. त्या तरुणांनी तिला मोटरसायकलवरुन नेले आणि घरी नेण्याऐवजी निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी महिलेवर सामुहिक अत्याचार केले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.
ADVERTISEMENT
7 जणांनी केला अत्याचार
अधिकची माहिती अशी की, नराधमांनी सामुहिक अत्याचार केल्यानंतर सकाळी धीर एकवटून महिला थेट चांपा पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने रात्री घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तातडीने केस नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सात मोटरसायकलींवर सात तरुणांचा चेहरे समोर आले. त्याच आधारावर पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटवून एकामागोमाग सर्वांना अटक केली.
प्रदीप मनहर, शिवम बंजारे, कृष्ण खूंटे, अनिल महिलांगे, सूरज टंडन, दीपेश कुमार कुर्रे आणि शानू मिर्झा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वांचे वय साधारण 19 वर्षे असून ते चांपाच्या वेगवेगळ्या ठिकाणांतील आणि घोघरा भागातील रहिवासी आहेत.
प्रकरणाची चौकशी सुरू
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की ते एका सांस्कृतिक कार्यक्रमातून परतत होते आणि त्याचवेळी त्यांना संधी मिळाली. ज्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. पोलिसांनी केवळ अटकेवरच थांबून न राहता आरोपींची संपूर्ण शहरातून धिंड देखील काढली आहे. जेणेकरून समाजात हा संदेश जाईल की अशा गुन्हेगारांना अजिबात सोडले जाणार नाही. त्यानंतर सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
हेही वाचा : बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं
ADVERTISEMENT
