Sindhudurg Crime : 60 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंधुदुर्गातील अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडल्याने कुडाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. कॉलेजला जाते असं सांगून घरातून बाहेर गेलेली तरुणी गेल्या 60 दिवसांपासून बेपत्ता होती. दरम्यान, तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिची जंगलात नेऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कुंभार याला अटक केली असून त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दीक्षा बागवे असं मृतदेह सापडलेल्या 17 वर्षीय तरुणीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 2 ऑक्टोबर रोजी कोकण भागात पावसाची विश्रांती, तर मराठवाड्यात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल?
अधिकची माहिती अशी की, कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) येथील 17 वर्षीय दीक्षा बागवे ही गेल्या दोन ऑगस्टपासून बेपत्ता होती. अखेर तिचा मृतदेह सापडला असून अल्पवयीन मुलीचा घातपात करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुडाळ तालुका न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलीसांनी युवकाला शिताफीने अटक करून आज कुडाळ न्यायालयात हजर केले. तब्बल दोन महिन्यानंतर दीक्षा बागवे याच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा अखेर कुडाळ पोलिसांनी आज लावला आहे. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाने या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगून ही कारवाई केली आहे.
घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्ट रोजी अचानक कॉलेजला जाते म्हणून निघाली ती बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून कुणाल कुंभार याने केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित कुणाल कुंभारकडून अजून काय काय माहिती येते? यावर या खूनाची व्याप्ती अवलंबून असणार आहे. माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. गोठोस येथील याच बंद मांगरात मागील दरवाजा फोडून आरोपीने 2 ऑगस्ट रोजी मुलीला आतमध्ये नेले आणि तेथेच गळा दाबून खून केला, अशी माहिती आरोपीने दिली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या फॉरेन्सीक एक्स्पर्ट टीम मृतदेहाचा तपास करत आहे.
हेही वाचा : जयंत पाटील भाजपात आले तर त्यांना गोपीचंद पडळकरांच्या मागे बसावे लागेल, चंद्रकांत पाटलांचा टोला
ADVERTISEMENT
