बाईचा नाद लय बेकार! महिलेशी बोलायचा म्हणून मित्रानेच मित्राचा काटा काढला, मोठं हत्यांकांड आलं समोर

मुंबई तक

• 08:00 AM • 26 Mar 2026

crime news : चहा विक्रेता तेजपालच्या खून प्रकरणात पोलिसांनी छडा लावला. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही खळबळनक घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मुकेशला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळपणे पथके तयार करून तपास सुरु केला. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुकानाबाहेर मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ

point

महिलेशी बोलत असल्याच्या कारणावरून तेजपालला संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील टुंडलामध्ये चहा विक्रेता तेजपालच्या खून प्रकरणात पोलिसांनी छडा लावला. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही खळबळनक घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मुकेशला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळपणे पथके तयार करून तपास सुरु केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद, पतीने पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारलं

दुकानाबाहेर मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ

दोन दिवसांपूर्वी जारौली कटजवळ चहा विक्रेता तेजपाल दुकानात झोपलेला असताना त्याची हत्या केली. सकाळी दुकानाबाहेर त्याचा मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळपणे चार पथके तयार करून तपास सुरु केला. पोलिसांनी जवळपासच्या रहिवाशांची चौकशी केली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा तपास केला. अटक केलेल्या मुकेशने चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, त्याचा आणि तेजपालचा एका महिलेवरून वाद सुरु होता. 

महिलेशी बोलत असल्याच्या कारणावरून तेजपालला संपवलं

मुकेशच्या म्हणण्यांनुसार, त्याचे महिलेसोबत संबंध होते आणि त्याने तिला तेजपालशी बोलण्यास वारंवार विरोध केला होता. मात्र, ती महिला आणि तेजपाल एकमेकांशी बोलत होते, याच रागातून त्याने हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली. घटनेच्याच दिवशी मुकेश घटनास्थळी दाखल झाला, तेजपाल दुकानात झोपला असता, त्याने लोखंडी सळई आणि पोलादी अवजाराने तेजपालच्या डोक्यावर वारंवार हल्ला करत जागीच ठार केले.  

हे ही वाचा : नांदेड शहरानजीक गावात चालत्या दुचाकीसह तरुण जळून खाक, अपघात की घातपात?

संबंधित प्रकरणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवी शंकर यांनी सांगितलं की, आरोपीने काळजीपूर्वक नियोजन करून हत्येचा गुन्हा दाखल केला. एका महिलेवरून सुरु असलेल्या वादातून ही हत्या झाली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.