महिलेनं स्वत:च्याच अंघोळीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर व्हायरल करत... मोठं कांड केलं

मुंबई तक

01 Apr 2026 (अपडेटेड: 01 Apr 2026, 06:02 PM)

crime news : पतीपासून सुटका मिळवण्याच्या हेतूने पत्नीने अंघोळ करताना स्वत:चा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप

point

नवऱ्याने बायकोचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील चॅट दाखवले

Crime News : पतीपासून सुटका मिळवण्याच्या हेतूने पत्नीने अंघोळ करताना स्वत:चा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं, ज्यामुळे लोकांना मोठा हादरा बसला. विवाहित महिलेने अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल केल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात पत्नीच या कटामध्ये सूत्रधार असल्याचा अलगडा केला. पत्नीने आपल्या प्रियकराच्या संमतीने पतीपासून सुटका मिळण्याच्या हेतूने अश्लील व्हिडिओ बनवत व्हिडिओ व्हायरल केले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कौटुंबिक वादातून सुनेनं सासऱ्याच्या अवघड जागेवर लाथ मारली, एका झटक्यात गेला जीव

पतीवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप

या प्रकरणाचा नवऱ्याने खुलासा केली की, 28 मार्च रोजी महिला गांधीनगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली. तिने पतीवर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनंतर पतीला बोलावले आणि पोलिसांच्या चौकशीदरम्यान पतीने खुलासा करत पत्नीने तिच्या प्रियकराला हाताशी धरत व्हिडिओ बनवून व्हायरल केला. 

नवऱ्याने बायकोचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील चॅट दाखवले

त्याने पोलिसांना पत्नी आणि प्रियकर या दोघांमध्ये झालेले अश्लील चॅट दाखवले होते, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी प्रियकराला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता, ही संपूर्ण कहाणी समोर आली. प्रियकराने घटनेबाबत सर्व काही सांगितले. या प्रकरणात सायबर पथकाने महिलेच्या सोशल मिडिया खात्याची तपासणी केली असता, महिलेच्या प्रियकराने तिला सिम कार्ड दिले होते. सोशल मीडियावर एक बनावट खाते तयार करून संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. 

हे ही वाचा : नागपूर : तरुणाने तरुणीचे केले लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत केला विवाह आणि गोमांस खाण्यास दबाव...

संबंधित प्रकरणात भिलवाड पोलीस अधीक्षक धर्मेंद्र यादव यांनी सांगितलं की, व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओबाबत भिलवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर व्हिडिओ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आला.