अनारकलीचे 70 वर्षीय वृद्धावर प्रेमसंबंध, नवऱ्याला समजताच मध्यरात्री 2 वाजता कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

मुंबई तक

07 Apr 2026 (अपडेटेड: 07 Apr 2026, 07:03 PM)

crime news : आठ वर्षांपूर्वी आरोपी रामलालची पत्नी अनारकली (वय 65) हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच संबंधामुळे रामलालच्या घरात कौटुंबिक वाद झाला होता. याच वादामुळे पत्नी त्याच्याशी बोलत नव्हती. अनादर आणि द्वेषामुळे रामलालने 10 दिवसांपूर्वी हजारीलालला संपवण्याचा कट रचला, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

हजारीलालचे रामलालची पत्नी अनारकलीशी अनैतिक संबंध 

point

मध्यरात्री 2 वाजता हजारीलालच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या संगम शहरातील यमुनानगर विभागातील नैनी पोलिसांनी अवघ्या 36 तासांत वृद्ध हजारीलाल यांच्या हत्येचा छडा लावला. या हत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 70 वर्षीय हजारीलाल यांची हत्या त्याच्या 66 वर्षीय प्रेयसीच्या नवऱ्याने केली होती. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : धक्कादायक... डोसा खाल्ला अन् दोन छोट्या मुलींचा गेला जीव, आई-वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक

हजारीलालचे रामलालची पत्नी अनारकलीशी अनैतिक संबंध 

तपासातून असे उघडकीस आले की, मृत हजारीलाल (वय 70) यांचे गेल्या आठ वर्षांपूर्वी आरोपी रामलालची पत्नी अनारकली (वय 65) हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच संबंधामुळे रामलालच्या घरात कौटुंबिक वाद झाला होता. याच वादामुळे पत्नी त्याच्याशी बोलत नव्हती. अनादर आणि द्वेषामुळे रामलालने 10 दिवसांपूर्वी हजारीलालला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. 

मध्यरात्री 2 वाजता हजारीलालच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

2 आणि 3 एप्रिल रोजी रात्री हजारीलाल हा वाळूसाठी पाळत ठेवत होता. त्याचक्षणी रामलाल कुऱ्हाड घेऊन घटनास्थळी पोहोचला. रात्री 2 वाजता रामलालने हजारीलालच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात हजारीलालचा दुर्दैवी अंत झाला. 

हे ही वाचा : साखरपुड्याआधी तरुणी बॉयफ्रेंडसोबत झाली फिजिकल, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं...

हत्येनंतर आरोपी रामलाल आपल्या घरी कुऱ्हाड घेऊन आला आणि ती कुऱ्हाड त्याने लपवली होती.  मृताचा मुलगा सोनू याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात तांत्रिक पुराव्यातून एका सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे, नैनी पोलिसांनी रामलाल याला धनुआ गावात अटक केली. आरोपीची ओळख पटल्यानंतर, हत्येदरम्यान वापरलेली रक्तात माखलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली. कायदेशीर कारवाईनंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले होते.