बायको मद्यधुंद स्थितीत पोलीस ठाण्यात विवस्त्रच पोहोचली, नंतर अधिकाऱ्यांसमोर अंगावरील चादर काढत...

crime news : एक महिला मद्यधुंद अवस्थेत अंगाला चादर एक गुंडाळून पोलीस ठाण्यात गेली होती, नंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हीही चक्रावून जाल.

crime news

crime news

मुंबई तक

21 Sep 2025 (अपडेटेड: 21 Sep 2025, 09:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात

point

नंतर अंगावरून चादरच दिली फेकून

point

नवऱ्याने घरातून आणले कपडे नंतर...

Crime News : एक महिला मद्यधुंद अवस्थेत अंगावर चादर गुंडाळून पोलीस ठाण्यात गेली होती. नंतर पोलीस ठाणे परिसरात तिने अंगावरील चादर काढून फेकून दिली. महिलेनं केलेल्या अशा कृत्याने पोलिसही चक्रावून गेले होते. त्यानंतर पोलिसांनीच एक चादर आणत तिचं विवस्त्र झालेलं शरीर झाकलं. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. या घटनेनं एकच गोंधळ उडाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुण घरातून झाला होता गायब, नातेवाईकांनी केली शोधाशोध, अखेर तलावात मृतदेह पाण्यावर तरंगत होता अन् जीभ...

पोलीस ठाण्यात महिला काय करत होती?

या घटनेदरम्यान, दोन तरुणींच्या मदतीने, महिलेला पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. त्यानंतर महिलेनं अर्धा तास गोंधळ घातला. महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याने तिचे हे कृत्य सामान्य नव्हते. एका पोलिस निरीक्षकाशी तिची बाचाबाचीही झाली. ही संपूर्ण घटना आग्राच्या ताजगंज पोलिस ठाण्याच्या विभाग नगर चौकीत गुरुवारी रात्री घडली. संबंधित माहिला ही 30 वर्षांची आहे. ती काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाणे परिसरात भाडेतत्वावर राहत होती. त्यानंतरच हे प्रकरण आता समोर आलं आहे. 

पतीने मद्य पिण्यास विरोध केल्याने,,,

महिलेचा पती हा 55 वर्षीय मजूरदार आहे. महिलेला पाच अपत्य आहेत. तिला दारूचे व्यसन आहे आणि तिचा नवरा या सवयीमुळे अस्वस्थ आहे. महिलेचे आणि तिच्या नवऱ्याचे अनेकदा भांडणही झाले. तिच्या पतीने तिला मद्य पिण्यास अनेकदा विरोध केला होता, त्यानंतर ती संतापली. ती अंगावर चादर गुंडाळून मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली होती. 

त्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान, तिच्या अंगावर चादर सैल झाली असता, पोलिसांनी पुन्हा तिच्या अंगावर चादर टाकली. तेव्हा परिस्थिती पाहता तिचा पती पोलीस ठाण्यात आला होता. सुरूवातीला पतीनेच मारहाणीचा आरोप केला होता, पण नंतर पतीने पोलिसांना सांगितलं की, गोंधळ आणि हिंसा करणारी त्याची पत्नीच आहे. त्यानंतर पोलिसांनी पतीला घरी जाण्यास सांगितले. 

हे ही वाचा : पैशांमुळे दोन्ही सख्खे भाऊ झाले पक्के वैरी, मोठ्याने धाकट्यावर चाकूने सपासप वार करत संपवत...

महिलेच्या पतीने तिचे कपडे आणले असता, नंतर पोलीस ठाण्याची लाईट बंद केली. तेव्हा दोन महिलांनी तिला कपडे घातले असता, महिला पुन्हा संतापली. तेव्हा तिने पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरूवात केली. तेव्हा महिला म्हणाली की, पोलीस आता पैशांची मागणी करतील, त्यानंतर पोलिसांनी महिलेला समजावले आणि ती पतीसोबत आपल्या घरी गेली. 

    follow whatsapp