Crime News : रस्त्यावर लघुशंका करण्यास विरोध केल्याने आरोपीने एकाला संपवल्याची घटना आहे. आरोपीने दारूच्या नशेतच एकाचा खून केल्याची घटना आहे. मृत व्यक्तीची अमित कुमार अशी ओळख समोर आली आहे. अमित कुमार हा आपल्या उपजिविकेसाठी दुकान चालवत होता. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर येथील काकादेव पोलीस ठाणे परिसरात घडला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धांगडधिंगा करणाऱ्यांना शिक्षकाने विचारला जाब, आरोपींनी केला शेवट
रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांना अमित कुमारने केला विरोध
अमित कुमार हा नवीननगर येथे काकादेनमध्ये प्रेम ऐड नावाने दुकान चालवत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून अमित कुमार घरी परतत होता. याचदरम्यान काही मद्यधुंद लोक रस्त्यावर लघुशंका करत असताना, अमित कुमारने त्याला लघुशंका करण्यापासून विरोध केला होता. यावरून आरोपी अमित कुमारशी वाद घालू लागला होता. नंतर त्याने शिवीगाळ देखील करण्यास सुरूवात केली होती.
हल्लेखोरांनी अमितच्या डोक्यात विटेनं हल्ला करत संपवलं
अशातच मृत व्यक्ती अमित कुमारचा मुलगा प्रताप सिंहच्या म्हणण्यानुसार, वडिलांनी लघुशंका करण्यास विरोध केला असता, त्यांना आरोपींनी शिवीगाळ केली. नंतर बेदम मारहाण करत डोक्यावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात अमित कुमारच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यानंतर अमित हा रस्त्यावर कोसळला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी हल्लेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच अमित कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान अमित कुमारचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणाचे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. पोलिसांनी घटनास्थळी आणि आसपासच्या परिसरात जाऊन तपास केला होता. संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार तरुण अमितला बेदम मारहाण करत होते. या घटनेनंतर परिसरात लोकांनी मोठी गर्दी देखील केल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं.
हे ही वाचा : सांगली : केतनराज अॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक
कुटुंबीयानी दावा केला की, सीसीटीव्हीचा तपास केला असून आरोपींना अद्यापही अटक केली नाही. त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केलेत. पोलिसांना तात्काळपणे अटक केली जावी अशी मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT












