Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध कळले अन् नंतर 800 फूट खोल दरीत सापडला मृतदेह

मुंबई तक

20 May 2023 (अपडेटेड: 20 May 2023, 12:23 PM)

Wife made filmy style plan for husband death : अनैंतिक संबंधात (extra marital Affair) अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची घटना घडलीय. पत्नीने फिल्मी स्टाईल फुल प्रुफ प्लान करून पतीचा जीव घेतला आहे.या घटनेने संपू्र्ण राज्य हादरलं.

extra marital Affair wife made filmy style plan for husband death

extra marital Affair wife made filmy style plan for husband death

follow google news

Wife made filmy style plan for husband death : देशभरात अनैतिक संबंधाच्या दररोज अनेक घटना समोर येत असतात. या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात (extra marital Affair) अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची घटना घडलीय. पत्नीने फिल्मी स्टाईल फुल प्रुफ प्लान करून पतीचा जीव घेतला आहे.या घटनेने संपू्र्ण राज्य हादरलं. (extra marital Affair wife made filmy style plan for husband death with her boyfriend)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक गोकलराम देवासी यांचे 3 वर्षापूर्वी गुजरातच्या मांगी देवीशी लग्न झाले होते. या लग्नानंतर मांगी देवीचे तिचा दुरचा नातेवाईक पन्नारामशी संपर्क झाला होता. या संपर्कात दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले होते. पतीच्या नकळत मांगी देवी पन्नारामशी फोनवर बोलायची कधी कधी भेटायची देखील. या भेटी दरम्यान दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले होते. गेले अनेक महिने पत्नीचे पन्नारामशी अनैतिक संबंध सुरु होते. या अनैतिक संबंधाची माहिती गोकलरामला मिळाली होती. त्यामुळे मांगी देवी भीतीच्या छत्रछायेखाली होती. मात्र नंतर मांगी देवीने पतीच्या हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा : आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

असा रचला हत्येचा कट

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा (Husband) काटा काढण्यासाठी पत्नी मांगी देवीने फुलप्रुफ प्लान रचला होता. ठरल्यानुसार मांगी देवीने गोकलरामला 6 मे रोजी गुजरातला माहेरी बोलावले होते. साधारण 4 दिवस गोकलराम माहेरीच राहिला. यानंतर 10 मे रोजी गोकलराम एकटाच घरी निघाला होता आणि मांगी देवी माहेरीच होती. गोकलरामच्या परतीच्या प्रवासात मांगी देवीचा प्रियकर पन्नाराम आणि त्याचा मित्र मालारामचे अपहरण केले. तसेच त्याला गुंगीचे औषध देऊन, बेशुद्ध करून त्याची गळा दाबून हत्या केली. या हत्येनंतर पन्नारामने माऊंट आबूच्या 800 फूट खोल दरीत मृतदेह फेकून दिला होता. मृतदेह दरीत टाकल्यानंतर प्राण्यांनी त्याचे लचके तोडले होते. त्यामुळे संपूर्ण पुरावे नष्ट झाले होते.

तीन आरोपी जेरबंद

दरम्यान गुजरातहून निघून अनेक तास उलटून देखील गोकलराम घरी आला नव्हता. त्याचा कॉल देखील लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात (police) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांना गोकलरामचा मृतदेह काही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी गोकलरामचे कॉल डिटेल्स काढले. या कॉल डिटेल्समध्ये त्याला शेवटचा कॉल मांगी देवीचा प्रियकर पन्नारामने केला होता. त्यामुळे कुटुंबियांनी पन्नारामला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी असता त्याने घटनेचा उलगडा केला. गोकलरामचा गळा दाबून त्याची हत्या करून मृतदेह माऊंट आबूच्या डोंगर दऱ्यात फेकला असल्याची कबूली पन्नाराम दिले. तसेच या घटनेत गोकलरामची पत्नी देखील सामील असल्याची धक्कादायक माहिती दिली.

हे ही वाचा : जावयाचा सासूवर बलात्कार, अश्लील फोटो काढले अन् म्हणाला…

दरम्यान पोलिसांनी (Police) या प्रकरणी पन्नाराम त्याचा मित्र मालाराम आणि मांगी देवी अशा तिघांना अटक केली. या तिघांवर आता गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

    follow whatsapp