बायको सोडून गेली, रिक्षा चालक बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; पोटदुखीमुळे उघडकीस आला प्रकार

Crime News : बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; पोट दुखू लागल्यानंतर सगळंच उघडकीस आलं, संपूर्ण परिसरात संतापाचा लाट

Crime News

Crime News

मुंबई तक

25 Oct 2025 (अपडेटेड: 25 Oct 2025, 12:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायको सोडून गेली, बापाकडून 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार

point

पोट दुखू लागल्यानंतर सगळंच उघडकीस आलं

Crime News : फरीदाबाद येथील वल्लभगडमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बापाने त्याच्या 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होता. मुलगी आजारी पडली आणि तिच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात गेली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. 

हे वाचलं का?

बायको सोडून गेल्यानंतर बापाने मुलीवर केले अत्याचार 

अधिकची माहिती अशी की, पीडित मुलगी ही इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. रिक्षा चालकाच्या दारुच्या व्यसनामुळे आणि मारहाणीमुळे त्याची बायको 6 पैकी 2 मुलांना घेऊन निघून गेली. ती तिच्या बहिणीसोबत राहू लागली. मात्र,दुसरीकडे पीडित मुलगी त्याच्या छोट्या भावांसोबत बापासोबतच राहात होती. मात्र, यावेळी बापाने त्याच्याच 14 वर्षीय मुलीवर 2 महिने अत्याचार केलाय. 

हेही वाचा : नांदेडच्या तरुणाचा कर्नाटकात खून, विवाहितेसोबत प्रेमसंबंध, महिलेच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण, चटके देऊन संपवलं

पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले की, हे प्रकरण पीडित मुलीला तिच्या शेजारच्या वृद्ध महिलेने रुग्णालयात उपचारांसाठी नेल्यानंतर समोर आले आहे. मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. शिवाय तिला ताप देखील आला होता. शेजारच्या महिलेने तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. तेव्हा पीडित मुलीने तिच्यासोबत बाप दुष्कृत्य करत असल्याचं सांगितलं. महिलेने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याठिकाणी पोहोचले. 

दरम्यान, पीडित मुलीने सांगितलं की, वडिल रोज रात्री नशेत घरी यायचे. गेल्या दोन महिन्यांपासून ते माझ्यावर अत्याचार करत आहेत. पोलीस अधिकारी म्हणाले, त्याची पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने मुलीसोबत अत्याचार केले आहेत. मुलगी भीतीमुळे गप्प बसून राहिली. वडिलांचे अत्याचार सहन करत राहिली. आजारी नव्हती तोपर्यंत तिने सहन केलं. 

बाल लैंगिक अपराध प्रतिबंध (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर लैंगिक छळाचं प्रकरण नोंदवण्यात आले आहे. आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली आणि शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलीस अधिकारी यादव यांनी सांगितले की, आता त्या व्यक्तीच्या तीन इतर अल्पवयीन मुलींचं समुपदेशन सुरु आहे, जेणेकरून हे शोधता येईल की त्यांच्या सोबतही कोणताही लैंगिक छळ किंवा अन्य अत्याचार झाला आहे का? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे? पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले
 

    follow whatsapp