Crime News : भांडणात मध्यस्थी करायला जाणे तरुणाला महागात, नातेवाईकांनी गोळ्या झाडून संपवलं

Crime News : दोन गटात वाद सुरु असताना एक तरुण मिटवण्यासाठी गेला. मात्र, त्याचीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

02 Oct 2025 (अपडेटेड: 02 Oct 2025, 06:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भांडणात मध्यस्थी करायला जाणे तरुणाला महागात

point

नातेवाईकांनी तरुणांना गोळ्या झाडून संपवलं

Crime News : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोटा पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील रामगड गावातील आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली. शंकर चरण (वय 29) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

हे वाचलं का?

जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद, मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाला संपवलं 

अधिकच्या माहितीनुसार, या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी काहींना अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपीचाही समावेश आहे, असं कोटा (ग्रामीण) चे पोलिस अधीक्षक (SP) सुजीत शंकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्यात आली आहे. मंडाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून मृत्यू झालेला तरुण रामगड गावातील रहिवासी शंकर चरण आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. धार्मिक कार्यक्रमातून मंदिरातून परतताना जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाले होते. यावेळी हा तरुण मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. मात्र, त्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. 

हेही वाचा : सारखं मोबाईलवर गेम खेळतो म्हणून मोठी बहीण रागावली, नाराज झालेल्या अल्पवयीन भावाने आयुष्य संपवलं!

पोलिसांनी पुढे बोलताना सांगितलं, दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू असल्याचे पाहून शंकर चरण यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी एका गटातील व्यक्तीने देशी पिस्तुलातून जवळून गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत शंकर चरण यांना कोट्यातील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. श्यामलाल चरण असं मुख्य आरोपीचं नाव आहे. तो मृतकाचा नातेवाईक आहे. श्यामलालसह काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. श्यामलाल व्यतिरिक्त इतर आरोपींची नावे बलराम, भूरिया, भंवरलाल, किशन आणि बालू अशी असून हे सर्व रामगड गावचे रहिवासी आहेत.श्यामलाल आणि बलराम यांना अलीकडेच खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातून तुरुंगातून सोडण्यात आले होते. 

हेही वाचा : अंबानींचं तेल-मीठ बंद करा, फडणवीस, ठाकरे, पवार, गांधी अन् नोकरदारांचे पैसे कापा, जरांगेंची शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी

    follow whatsapp