नवरा-बायकोत वाद, फेसबुक लाईव्ह येऊन पतीनं संपवलं जीवन

मुंबई तक

• 07:13 PM • 19 Aug 2026

Crime News : एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह येऊन गळफास घेत आपलं जीवन संपवलं. नवरा-बायकोच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोत वाद

point

फेसबुक लाईव्ह येत नवऱ्याने जीवन संपवलं

Crime News : एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह येऊन गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मृत व्यक्तीची सनी कुमार उर्फ राहुल (वय 26) अशी ओळख समोर आली आहे. जीवन संपवण्यापूर्वी सनीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. या घटनेदरम्यान पत्नीने सातत्याने फोन केले होते, मात्र सनीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील इज्जतनगर ठाणे क्षेत्रातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलगा होईल असं दाखवलं आमिष, महिलेनं 47.88 लाख रुपयांना घातला गंडा

क्षुल्लक कारणावरून सनी आणि काजलमध्ये वाद

घडलेल्या घटनेनुसार, सनी आपली पत्नी काजल आणि तीन मुलांसोबत उत्तराखंड येथील हल्दानी येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून सनी आणि काजलमध्ये वाद निर्माण झाला होता. दोघांच्या वादानंतर काजल ही आपल्या माहेरी आली होती, दोन दिवसांपासून ती तिथेच राहत होती. रविवारी सायंकाळी हल्दानीहून परतल्यानंतर ती बरेली येथे पोहोचली होती. 

फेसबुक लाईव्ह येत नवऱ्याने जीवन संपवलं

बरेलीला आल्यानंतर सनीने आपली पत्नी काजलसोबत फोनवर बोलणं केलं. कुटुंबीयांच्या दिलेल्या माहितीनंतर काहीच वेळात सनीने कथितरित्या एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. कुटुंबीय आणि इतर काही लोक हे घटनास्थळी दाखल झाले होते. सनीचा मृतदेह हा लटकलेल्या स्वरुपात आढळून आला होता. या घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. 

हे ही वाचा : शाळेची वेळ संपल्यानंतर एकाच बंदिस्त वर्गात शिक्षक, विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप

घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह फासावरून खाली उतरवला होता. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. पोलिसांनी मृत तरुणाच्या मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेतला आणि व्हिडिओचा तपास सुरू आहे. पोलीस नवरा-बायकोमधील झालेल्या भांडणाचा तपास करत आहे.