नवऱ्याने बायकोच्या चपलेत लावलेलं GPS, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् नको ते करताना आला नवरा!

crime news : नवऱ्याचा आपल्याच बायकोवर अनैतिक प्रेमप्रकरणाचा संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या बायकोच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला होता. याच जीपीएसमुळे नवऱ्याने आपल्या बायकोचे असलेले प्रेमसंबंध पकडले. बायकोने तिच्या प्रियकराला घरी बोलावले असता, नवऱ्याने दोघांना देखील रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली.

crime news

crime news

मुंबई तक

08 Apr 2026 (अपडेटेड: 08 Apr 2026, 08:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने जीपीएसच्या मदतीने बायकोला रंगेहाथ पकडलं

point

प्रियकराकडून परवानाधारक पिस्तूल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतली

Crime News : नवऱ्याचा आपल्याच बायकोवर अनैतिक प्रेमप्रकरणाचा संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या बायकोच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला होता. याच जीपीएसमुळे नवऱ्याने आपल्या बायकोचे असलेले प्रेमसंबंध पकडले. बायकोने तिच्या प्रियकराला घरी बोलावले असता, नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरण हे पाटणा येथील फुलवारी शरीफमधील एकता नगरमध्ये घडलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्रपूर: मित्राच्या वरातीत DJ च्या तालावर थिरकला, पुढच्या मिनिटात तरुणाचा मृत्यू

नवऱ्याने जीपीएसच्या मदतीने बायकोला रंगेहाथ पकडलं

नवऱ्याने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. बायको तिच्या प्रियकरासोबत घटनास्थळीच होती, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ ऐकून आजूबाजूला लोक जमा झाले आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. या गोंधळादरम्यान धक्काबु्क्की झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी पोलीस ठाणे गाठलं. 

पतीने बायकोच्या प्रियकराकडून परवानाधारक पिस्तूल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतली

घडलेल्या घटनेनुसार, संतप्त झालेल्या पतीने बायकोच्या प्रियकराकडून परवानाधारक पिस्तूल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. नंतर पोलिसांनी मनधरणी करून पत्नी आणि तिच्या प्रियकरात एक समझोता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई नको. नंतर पोलिसांनी कसलीही कारवाई न करता सर्वांना सोडून दिले. 

हे ही वाचा : बीड : अंबाजोगाईत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चाकाखाली चिरडलं, भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा अंत

या संपूर्ण प्रकरणात, फुलवारी शरीफ पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद शहबाज आलम यांनी सांगितलं की, डायल 122 पथकाने लोकांना पोलीस ठाण्यात आले होते, परंतु कोणीली कसलाही लेखी अर्ज सादर न करता सर्वजण निधून गेले.