Crime News : एका महिलेनं आपला नवरा शारीरिकदृष्ट्या कमजोर असल्याचा दावा केला. ती महिला इथवरच न थांबता तिने आपल्या दीराने लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे. सासरच्या मंडळींनी तिच्यावर छळ केल्यानंतर तिने विरोध दर्शवला असता, तिला घराबाहेर काढण्यात आल्याचा पीडिते सूनेचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आगरा येथील आहे. या घटनेनं माणुसकीला काळिमा फासली आहे. या प्रकरणात महिलेनं संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे हादरलं! दोघेही एकत्र दारू प्यायले, नंतर वाद झाला, गर्लफ्रेंडची सटकली आणि बॉयफ्रेंडलाच...पोरींचा नाद बेकार
नवरा शारीरिकदृष्ट्या कमजोर
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, विवाहित महिलेनं सांगितलं, तिचा विवाह हा 10 मे 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर ती तिच्या सासरी गेली. त्यानंतर तिला कळालं की आपला नवरा हा शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे. तेव्हा तिने आपल्या पतीला डॉक्टरकडे नेण्याबाबत सांगितले असता, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली.
सासरच्या मंडळींनी हुंड्यात फ्लॅटची मागणी केली नंतर...
विवाहित महिलेचा आरोप केला, पती शरीराने कमजोर असल्याचा फायदा घेत माझ्यावर दीराने माझा शारीरिक छळ केला. पीडित महिलेनं हा एकूण प्रकार आपल्या सासरच्या मंडळींना सांगितला असता, ते काहीही बोलले नाहीत. सासरच्या मंडळींनी हुंड्यात फ्लॅटची मागणी केली. तिने अनेकदा विरोध केला असता, तिला घरातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अशा स्थितीत तिचे सासरचे मंडळी सर्व संपत्ती विकून विदेशात जाणार असल्याचा प्लॅन करत आहेत.
हे ही वाचा : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकींनी नाव काढलं! MBBS चं शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरल्या, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
या प्रकरणात आता पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीशपूर निरीक्षक यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून 7 ऑक्टोबर रोजी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालत तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
