Crime News : एका पुरुषाने एका महिलेच्या डोक्यावर पिस्तूल रोखली आणि जर तिने कोणाला काही सांगितल्यास तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन प्रसिद्ध करण्याची धमकी दिली होती. तिला धमकी देणारी व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा नवराच होता. ही घटना लखनऊमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. पतीचं नाव सतपाल असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नांदेड हादरलं! लग्नाला वर्षच झालं, बायको गर्भवती असताना तरुणाचा विजेच्या झटक्यानं दुर्दैवी अंत, भावाचंही निधन
तिच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले
हे प्रकरण सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरु झाले, मालमत्तेच्या बाबतीत काम करताना, सतपाल सिंग एका महिलेला भेटले होते. या भेटीनंतर त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्यात नजीकता वाढली. नंतर सतपालने तिच्याशी विवाह करणार असल्याचं वचन दिले होते. या लग्नापूर्वी सतपालने तिच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले, असा आरोप महिलेनं करण्यात आला. ती महिला गर्भवती राहिली होती. मात्र, सतपालला मूल नको होतं. तेव्हा त्या सतपालच्या आई-वडिलांनी तिला गर्भपात करण्यात भाग पाडण्यात आल्याचा आरोप महिलेनं केला.
5 कोटी रोख आणि अलिशान कारची मागणी
यानंतरही, महिलेला लग्नाचे आश्वासन देण्यात आले होते. प्रकरण वाढत गेल्यानंतर आरोपीने एक महत्त्वाची मागणी केली. पंकज आणि त्याच्या कुटुंबाने 5 कोटी रोख आणि अलिशान कारची मागणी केली. महिला आणि तिच्या कुटुंबाने याबाबत सतपालच्या कुटुंबियांची मागणी पूर्ण केली नाही, हे पाहून पंकजने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
बराच काळ छळ सहन करावा लागल्यानंतर, पीडितेनं 2025 मध्ये सतपाल सिंगविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. तिनं सांगितलं की, तुरुंगवास टाळण्यासाठी सतपालने 28 रोजी आर्य समाज मंदिरात तिच्याशी विवाह केला होता. या प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, विवाहानंतर सतपालने तिला घरी नेले नाही, तसेच तिला पत्नीसारखे सांभाळले नसल्याचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात बैलगाडीसमोर आलेल्या बिबट्याला बैलांनीच उधळवून लावले, उसतोड मजूर...
2 डिसेंबर रोजी सतपाल हा महिलेलाल आपल्या घरी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. ती तिच्या आईसोबत दुपारी 4 वाजता आली. ती महिला येताच सतपाल सिंगचे वडील गिरीश कुमार सिंग, आई पंकज सिंग, बहीण रिचा सिंग तसेच धाकट्या भावाच्या पत्नीने तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेचा दावा आहे की, तिला मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबला, नंतर तिला गंभीरपणे मारहाण करण्यात आली. नंतर केस रद्द करण्याबाबत त्याने तिच्या आईला मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, या प्रकरणात डीसीपी पूर्व शशांक सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











