Crime News : केरळातील त्रिशूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेनं त्रिशूरमधील पिथुक्कड पूर्णपणे हादरून गेलं आहे. रविवारी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या हातात एक बॅग होती. त्या बॅगेबद्दल पोलिसांनी विचारलं असता, व्यक्तीने संबंधित बॅग ही पोलिसांच्या हातात दिली. पोलिसांनी जेव्हा ती बॅग उघडली असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या बॅगेत लहान बाळांची हाडे होती. या प्रकरणाची माहिती समोर येताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बाप नाही हैवान! दारूच्या नशेत लेकीच्या खांद्यावर कुऱ्हाडीने सपासप वार, पत्नीलाही... नेमकं घडलं काय?
नेमकं प्रकरण काय?
पोलीस ठाण्यात बॅग आणलेल्या व्यक्तीचं नाव भाविन ( वय 25) असे आहे. त्याच्याकडे पोलिसांनी याबाबतची चौकशी केली असता, त्याने घटनेचा घटनाक्रम सांगितला. यामुळे आता पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. भाविनचे अनीशा नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. अनीशाचं वय वर्षे 22 होतं. हे दोघेही गेल्या पाच वर्षांपासून नातेसंबंधात होते. त्यांचा एकमेकांशी विवाह झाला नव्हता. तरीही अनीशा दोन वेळा प्रेग्नंट होती. अनीशाने दोनदा बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर तरुणी आणि तरुणाने हे भयंकर कृत्य केलं.
मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना मारण्यात आलं होतं. भाविन आणि अनीशा यांचं सोशल मीडियावरून 5 वर्षांपूर्वी एकमेकांशी सूत जुळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं पहिलं बाळ हे 6 नोव्हेंबर 2025 मध्ये जन्माला आलं होतं. या घटनेनंतर अनीशालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दुसऱ्या मुलांना जन्म दिला अन्..
दरम्यान, 29 ऑगस्ट 2024 मध्ये अनीशाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. त्यावेळी तिनं आणि तिच्या प्रियकराने सांगितलं की, अनीशाने बाळाला जन्म दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी मारलं आणि मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवून भाविनच्या घरी पोहोचवला. भाविनने ते आपल्या घराच्या मागील बागेत पुरला होता. काही महिन्यानंतर तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याची हाडे गोळा करण्यात आली होती.
हेही वाचा : मुलीने अल्पवयीन मुलाला भेटायला टेरेसवर बोलावले, डेटिंगचा विषय काढताच मुलाची सटकली अन्..
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या धक्कादायक दाव्यात अनीशाला धार्मिक पूजेसाठी हे अवशेष जपून ठेवण्यास सांगितलं. पण तिला ब्लॅकमेल करायचे होते. जेव्हा अनीशाने प्रेमबंध तोडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भाविनने तिला धमकावले. पुढे पोलिसांनी सांगितलं की, भाविननेच या घटनेचा खुलासा केला आहे. त्याने पोलिसांना हाडे दिली आणि सर्व घटनाक्रम सांगितला. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
