Crime News : बंगळुरूतील महादेवपुरममध्ये एका महिलेनं आपल्याच पाळीव कुत्र्याचा गळा चिरून हत्या केली. यापूर्वीच त्याच महिलेच्या घरात आणखी एक कुत्रा गायब झाल्याने लोकांनी काळ्या जादूचा संशय व्यक्त केला. याआधीही महिलेच्या घरातून एक कुत्रा गायब झाला असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, कुत्र्याची हत्या करणाऱ्या महिलेचं नाव त्रिपर्णा असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'बहिणीचा नवरा माझ्या बायकोसोबत...', लग्नाच्या 7 दिवसानंतरच पत्नीने केला भलताच खेळ!
मालकीनीनेच कुत्र्याचा चिरला गळा
काळी जादू प्रकरणाच्या संशयावरूनच त्रिपर्णाने कुत्र्याची हत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे. व्यवसायात तोटा निर्माण झाल्यानंतर त्रिपर्णाने आपल्यासोबत चार पाळीव कुत्रे पाळले. तिला सर्वाधिक आवडणारा कुत्रा हा काही दिवसांआधीच मरण पावला होता. तिच्या लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर तिने कुत्र्याचे प्रेत 40 दिवस तिथंच ठेवले. यानंतर त्रिपर्णाने घरातील देव्हाऱ्यात कुत्र्याचं मुंडकं ठेवल्याची माहिती समोर आली.
बंद खोलीत कुत्र्याचा मृतदेह
दरम्यान, कुत्र्याचा मृतदेह हा कुजू लागला होता. यामुळे अपार्टमेंटमध्ये दुर्गंधी पसरली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी बंगळुरू महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बंगळुरू महापालिका आणि पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह असलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
हेही वाचा : पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, निर्जनस्थळी नेलं अन् सपासप वार करत संपवलं, कारण ऐकून हादरून जाल
आता त्रिपर्णाविरूद्ध प्राणी हत्या, प्रतिबंध आणि संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेवपुरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याचे शवविच्छेदन केलं आहे. त्याचा रिपोर्टही येणं बाकी आहे.
ADVERTISEMENT
