लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

07 Jun 2026 (अपडेटेड: 07 Jun 2026, 02:42 PM)

Crime News : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे आईनेच आपल्या 5 वर्षीय मुलीची हत्या केली. आई आपल्या लिव्हइन पार्टनरसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पाच वर्षांच्या मुलीला नात्यातील अडथळा मानत होती, त्यामुळेच तिने मुलीची हत्या केली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आई आणि लिव्ह पार्टनरविरूद्ध गुन्हा दाखल 

point

मुलीने बिर्याणी खाल्ल्याचा आईचा दावा 

Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूतून आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे आईनेच आपल्या 5 वर्षीय मुलीची हत्या केली. आई आपल्या लिव्हइन पार्टनरसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पाच वर्षांच्या मुलीला नात्यातील अडथळा मानत होती, त्यामुळेच तिने मुलीची हत्या केली. सध्या, पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी 39 वर्षीय महिला आणि लिव्हइन पार्टनरविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस पथकाने दोघांचही चौकशी करत प्रकरणाचा तपास सुरू केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अखेर विद्यार्थ्याने नको तेच.. भयंकर घडलं

आई आणि लिव्ह पार्टनरविरूद्ध गुन्हा दाखल 

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आईची ओळख वेन्नेला अशी पटली आहे. दरम्यान 25 मार्च रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी 4 जून रोजी कडुगाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीपासून विभक्त झालेल्या प्रियांका आणि लिव्ह इन पार्टनर मोहनविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या तक्रारीच्या आधारे मोहनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. 

मुलीने बिर्याणी खाल्ल्याचा आईचा दावा 

 एफआयआयनुसार, प्रियांकाने सुरूवातीला सांगितलं की, 24 मार्च रोजी मुलीने रात्री बिर्याणी खाल्ल्याचा तिच्या आईने दावा केला होता. मात्र, नंतर दावा केला की, कोलारमधील एका कॅफेत मुलीचा वाढदिवस साजरा करताना तिला वातानुकूलित गाडीत झोपवून ठेवण्यात आले, नंतर ते घरी परतले आणि दुसऱ्याच दिवशी मृतावस्थेत आढळून आली. 

हे ही वाचा : Astrology : त्रिपुष्कर योग 2026, 'या' राशीचे भाग्य खुलणार

आईच मुलीला प्रेमसंबंधाच्या नात्यातील अडथळा मानत असल्याचा संशय

दरम्यान, पोलिसांच्या पथकने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या वडिलांना भलताच संशय बळावला गेला. नंतर त्यांनी शवविच्छेदन अहवाल त्यांच्या बहिणीला आणि इंग्लंडमधील एका बालरोगतज्ज्ञाला दाखवला होता. ज्यामुळे मुलीच्या मृत्यूचं कारण त्या अहवालामुळे समोर आले. आईच मुलीला आपल्या प्रेमसंबंधाच्या नात्यातील अडथळा मानत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस वडिलांच्या आरोपांची कसून चौकशी करत आहेत.