एकतर्फी प्रेमातून हैवान बनला तरुण, 26 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं!

मुंबई तक

• 07:44 AM • 04 Jul 2026

Crime News : एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या तरुणाने तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना ओडिशातील राउरकेला येथे घडली. या घटनेत 26 वर्षीय तरुणी 40 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एकतर्फी प्रेमातून हैवान बनला तरुण,

point

26 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं!

Crime News : एका तरुणाने कथितपणे एकतर्फी प्रेमातून 26 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना घडली. या घटनेत तरुणी सुमारे 40 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी बराच काळ संबंधित तरुणीच्या मागे लागला होता. त्याला तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवायचे होते, मात्र तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्याने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

खिडकीतून खोलीमध्ये पेट्रोल टाकले अन् पुढे काय घडलं? 

शुक्रवारी उशिरा रात्री तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना आरोपी तेथे पोहोचला. त्याने घराच्या खिडकीतून खोलीमध्ये पेट्रोल टाकले आणि त्यानंतर आग लावली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण खोलीला वेढा घातला आणि तरुणी आत अडकली. आगीच्या ज्वाळांमध्ये सापडलेल्या तरुणीने मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि तरुणीला घराबाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने राउरकेला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती सुमारे 40 टक्के भाजली असून तिच्यावर डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ही घटना ओडिशातील राउरकेला येथून एक समोर आली आहे. सुंदरगड जिल्ह्यातील बिसरा ब्लॉकमधील जराटोला गावात हा प्रकार घडला. 

आरोपी स्वतःही आत्महत्या करण्याच्या तयारीत

राउरकेलाचे पोलीस अधीक्षक नितेश वाधवानी यांनी या घटनेची आणि आरोपीच्या अटकेची पुष्टी केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण एकतर्फी प्रेमाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. तरुणीच्या घराला आग लावल्यानंतर आरोपी स्वतःही आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून मोठी अनहोनी टाळल्याचे सांगण्यात आले. फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.