Crime News : हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका हॉटेलमध्ये 26 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रेणुका असे मृत तरुणीचे नाव असून, ती अलवाल येथील रहिवासी होती. गुरुवारी (2 जुलै) रात्री रेणुका ही 34 वर्षीय फारूक नावाच्या व्यक्तीसोबत हॉटेल ग्रँड लॉजमध्ये मुक्कामासाठी आली होती.
ADVERTISEMENT
गळफास घेतल्याचा फारुकचा दावा
शुक्रवारी (3 जुलै) सकाळी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलच्या खोलीत रेणुका मृतावस्थेत आढळली. प्राथमिक चौकशीत फारूकने पोलिसांना सांगितले की, तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि परत आल्यावर त्याला रेणुका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्याने तत्काळ हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड
नातेवाईकांना वेगळाच संशय
मात्र, मृताच्या नातेवाईकांनी हे आत्महत्येचे दावे फेटाळून लावले आहेत. ही आत्महत्या नसून खूनच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. रेणुकाच्या कुटुंबीयांनी फारूकच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : 'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची; शेवटी दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं
फारुक पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रेणुकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. संशयित फारूकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












