कानात स्क्रू ड्रायव्हर, डोळे काढले आणि हात पाय छाटले; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संपवल्याचा आरोप

Crime news : इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या वंशराजची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या भीषण हत्येमागे दुसरी तिसरी कोणतीही व्यक्ती नसून त्या तरुणाचा मित्रच आहे. वंशराच्या कानात स्क्रू ड्रायव्हर घालून, नंतर त्याचे डोळे काढण्यात आले आणि त्याचे हात पाय छाटून टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Crime news

Crime news

मुंबई तक

09 May 2026 (अपडेटेड: 09 May 2026, 03:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाच मित्रांनी वंशराजची निर्घृणपणे हत्या केली

point

कानात स्क्रू ड्रायव्हर, दोन्ही डोळे काढले आणि दोन्ही हात पाय छाटले

Crime news : बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गोनावा उत्क्रमित मध्य विद्यालयात इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या वंशराजची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या भीषण हत्येमागे दुसरी तिसरी कोणतीही व्यक्ती नसून त्या तरुणाचा मित्रच आहे. या हत्येनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी आग लावून मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या भयंकर घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली, नंतर रेल्वेखाली फेकले; दोन्ही पाय... भयंकर घडलं

संबंधित प्रकरणात मृत वंशराजचे वडील, संतोष कुमार सिन्हा, झारखंड येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. घराण्याची परंपरा पुढे चालावी या मोठ्या आशेने कुटुंबाने आपल्या थोरल्या मुलाचे नाव वंशराज असे ठेवले होते, पण या घटनेनं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. वंशराज हा शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता, सायंकाळी घरीच परतला नाही. काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याच्या भीतीने, त्या कुटुंबाने मित्र प्रियांशूला पकडून त्याची चौकशी केली असता, तो त्यांची सतत दिशाभूल करत होता. वंशराज वॉटरपार्कमध्ये बु़डाल्याची खोटी कहाणी रचायचा. 

कानात स्क्रू ड्रायव्हर, दोन्ही डोळे काढले आणि दोन्ही हात पाय छाटले

कुटुंबाने गंभीर आरोप केला की, प्रियांशूसह पाच मित्रांनी वंशराजला नेऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली. मृतदेहाची अवस्था इतकी गंभीर होती की, पाहणाऱ्यांच्या डोळ्याच अश्रू तरळू लागले होते. कुटुंबाने दावा केला की, मारेकऱ्यांनी विद्यार्थ्याच्या कानात स्क्रू ड्रायव्हर घातला, त्याचे दोन्ही डोळे काढले आणि दोन्ही हात पाय छाटून टाकले. 

हे ही वाचा : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

अशातच पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, मृत्यूमागील नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालानंतर अधिकृतपणे समोर येईल. या हत्येमुळे परिसरात तणाव वाढला आहे. संतप्त जमावाने काली मंदिरानजीक येथील मुख्य रस्ता अडवला, इमारतील आग लावली आणि आरोपींना अटक करण्यात आली.