नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..

मुंबई तक

09 Jun 2026 (अपडेटेड: 09 Jun 2026, 03:37 PM)

Crime News : नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी नवऱ्या मुलाचे आई-बाबा गेल्याने नवीन संसार सुरू होण्याआधीच नात्याला ब्रेक लागल्याची घटना उघडकीस आली. हनिमूनसाठी जोडप्यांना सासू-सासऱ्यांनी प्रायव्हसी न दिल्याने वधूनेच पतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.  

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा बायकोच्या हनिमूनसाठी नणंद, सासू-सासरे गेले

point

प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत

Crime News : नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी नवऱ्या मुलाचे आई-बाबा गेल्याने नवीन संसार सुरू होण्याआधीच नात्याला ब्रेक लागल्याची घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील मेरठमधून हा विचित्र प्रकार समोर आला असून सर्वजण थक्क झाले आहेत. हनिमूनसाठी जोडप्यांना सासू-सासऱ्यांनी प्रायव्हसी न दिल्याने वधूनेच पतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर : सावत्र बाप 8 वर्षीय मुलीला कपडे काढायला लावायचा अन् 'नको तेच..'

बहुमा पोलीस ठाणे परिसरातील रामराज येथील एका मुलीचा आणि दिल्लीतीत पटेनगर येथील मुलाचा विवाह झाला होता. मुलगी ही पदवीधर आहे. तर मुलगा सिंगापूरमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. 

नवरा बायकोच्या हनिमूनसाठी नणंद, सासू-सासरे गेले

पत्नीने आरोप केला की, लग्नानंतर तिचा नवरा हनिमूनला गेले, पण त्यांच्यासोबत तिची सासू, सासरा, नणंद आणि दीर यांच्यासह संपूर्ण कुटुंहबाला सोबत घेऊन गेला. यामुळे पती-पत्नीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले. 

नवविवाहित जोडप्याने सांगितलं की, हनिमून हा जोडप्यांसाठी खाजगी आणि महत्त्वाचा काळ असतो. नवरा त्याच्या कुटुंबासोत प्रवासात असल्याने तिला त्याच्यासोबत वेळच घालवता आला नाही. याच प्रकरणाची सुनावणी कुटुंब समुपदेशन केंद्रात सुरू ठेवण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा समुपदेशन झाल्याचे सांगण्यात येते. 

हे ही वाचा : जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने...

प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत

पतीचे म्हणणे असे की, कुटुंबालवा आनंदी ठेवण्यासाठी त्याने सर्वांना सोबत घेतले होते. त्याच्या मते, त्याने काहीही चुकीचं केलं नव्हतं. तीन वेळा समुपदेशन करून पती पत्नीत एकमत झाले नाही आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले.