इसमानं मृतदेहाचे तुकडे खाण्यासाठी अज्ञात व्यक्तीची केली हत्या, आरोपी नरभक्षक...?

crime news : एका व्यक्तीने मृतदेहाचे तुकडे खाण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यानं दावा केला की, चौकशीदरम्यान, आरोपीने पीडितेचं मांस खाण्याच्या हेतूने हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:00 AM • 14 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

आरोपीने 'त्या' गोष्टीसाठी अज्ञात व्यक्तीची केली हत्या 

crime news : पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने मृतदेहाचे तुकडे खाण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यानं दावा केला की, चौकशीदरम्यान, आरोपीने पीडितेचं मांस खाण्याच्या हेतूने हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. ही घटना कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाट येथील कुर्शत परिसरात घडली, यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अनैतिक संबंध टिकवण्यासाठी महिलेचा खतरनाक प्लान, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, अन् शीर बोअरवेलमध्ये टाकलं

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी सांगितलं की, मृताची अद्याप ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मृत व्यक्ती ही परिसरातील स्मशानभूमीजवळील असलेल्या एका झोपडीत राहत होती. कुर्शात येथील एका तलावत तो मृतावस्थेत आढळला. वृत्तानुसार, मतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. संशयित आरोपीचं नाव दौस आलम असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपीने 'त्या' गोष्टीसाठी अज्ञात व्यक्तीची केली हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारूच्या नशेत असून या प्रकरणात पोलिसांनी दावा केला की, आरोपीने अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, नंतर मृतदेह हा पाण्याच्या टाकीत नेला, तो स्वच्छ करत लपवण्यात आला. चौकशीदरम्यान. आरोपीने हत्येचा कबुलीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने मानवी मांस खाण्याच्या उद्देशाने ही हत्या केली. हे नरभक्षकाचे लक्षण असल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.

हे ही वाचा : अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग... PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती, पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की, स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीबाबतची माहिती मिळाली, नंतर त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

    follow whatsapp