बेपत्ता महिलेची बॉडी जंगलात सापडला, DNA चाचणीमुळे सापडला खुनी; भयंकर प्रकरण!

मुंबई तक

• 07:44 AM • 07 Jun 2026

Crime News : एका विवाहितेची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून डीएनए चाचणीतून हे गूढ उकलले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बेपत्ता महिलेची बॉडी जंगलात सापडला,

point

DNA चाचणीमुळे सापडला खुनी; भयंकर प्रकरण!

Crime News : एका बेपत्ता महिलेचा प्रकरणाचा तपास करताना एका धक्कादायक हत्येचा उलगडा झाला आहे. 26 वर्षीय श्वेता बी. ही महिला 19 जानेवारी रोजी मायासांद्रा गावी वैयक्तिक कामासाठी जात असल्याचे सांगून घरून बाहेर पडली होती, मात्र ती परतली नाही. पतीने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी रामसागर राखीव वनक्षेत्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने पोलिसांनी डीएनए चाचणीचा आधार घेतला, ज्यातून हा मृतदेह श्वेताचाच असल्याचे स्पष्ट झाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?

सोन्याची नथ आणि बांगड्यांचे तुकडे सापडले  अन्,... 

तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून अर्धवट जळालेली पादत्राणे, सोन्याची नथ आणि बांगड्यांचे तुकडे सापडले. श्वेताच्या कुटुंबीयांनी या वस्तूंची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी संशयाची सुई तिच्या जवळच्या व्यक्तींकडे वळवली. तांत्रिक पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्सच्या मदतीने पोलिसांनी 55 वर्षीय भानूप्रकाश या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती भानूप्रकाश आणि श्वेता यांच्यात अनैतिक संबंध होते, परंतु श्वेताचे इतर पुरुषांशी असलेले संबंध असल्याच्या संशयावरून भानूप्रकाश तिच्यावर रागावत होता आणि त्यातूनच त्याने तिला संपवण्याचा कट रचला.

हेही वाचा : सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर

पेट्रोलचा वापर करून मृतदेह जाळला 

हत्येच्या कटाचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आले होते. घटनेच्या दिवशी भानूप्रकाशने श्वेताला बहाण्याने दुचाकीवर बसवून रामसागर राखीव वनक्षेत्रात नेले. तिथे तिला गुदमरून मारल्यानंतर त्याने आधीच खरेदी करून ठेवलेल्या पेट्रोलचा वापर करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर त्याने श्वेताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते बेलूर क्रॉस येथील एका सावकाराकडे गहाण ठेवले होते. तपासादरम्यान पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले असून, सावकाराच्या रजिस्टरमध्ये भानूप्रकाशने स्वतःचे नाव आणि स्वाक्षरी नोंदवल्याचे सिद्ध झाले आहे.

या गंभीर गुन्ह्याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक के.व्ही. अशोक यांनी सांगितले की, डीएनए रिपोर्ट आणि जप्त केलेले दागिने हे भानूप्रकाशच्या विरोधात भक्कम पुरावे म्हणून काम करतील. पोलिसांनी भानूप्रकाशला हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मृत श्वेताच्या मागे दोन लहान मुली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेंगळुरूच्या तुमाकुरू जिल्ह्यातून ही घटना उघडकीस आली आहे.