Crime news : जोधपूरच्या मनाई गावात लग्न समारंभा दिवशीच अक्रीत घडलं. विवाहाच्या काही तासांपूर्वी दोन बहिणींनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या घटनेनं आनंदाच्या समारंभात विरजन निर्माण झालं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अकोल्यात बारावी बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात जाऊन सोडवला पेपर
आनंदाचं वातावरण दु:खात बदललं
शोभा आणि विमला यांचा शनिवारी विवाह होणार होता, पण त्याआधीच काही तास शुक्रवारी त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते, त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं.
एडीसीपी म्हणाले की, त्यांच्या घरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लग्नउत्सव समारंभ सुरु होता, पण या घटनेनंतर कुटुंबियांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषत केले. या घटनेनंतर दोघींच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती दिली.
संबंधित घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, बहिणीचा मृत्यू हा विषारी पदार्थांचे सेवन केल्याने झाला असावा, अशी शक्यता आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या प्रकरणी तरुणींच्या मामाने एक धक्कादायक आरोप केला.
हे ही वाचा : मुंबई: विक्रोळी पंप हाऊसच्या गेटवरून उडी मारताना मद्यधुंद तरुणाच्या हातात रॉड घुसला, मध्यरात्री उडाला गोंधळ
दाजींच्या भावाने लग्नासाठी दबाव आणला, मृतांच्या मामाचा गंभीर आरोप
या प्रकरणी मृत तरुणींचा मामा जसवंत सिंहने आरोप केला की, दोन्ही बहिणींचे शरीर हे निळे पडले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. जसवंत सिंह म्हणाला की, दाजी दीप सिंह यांच्या भावाने लग्नासाठी दबाव आणला होता. दोन्ही बहिणींचा साखरपुडा हा दुसरीकडे ठरवण्यात आला होता, पण तो तुटला. त्यानंतर जेमला गावात त्यांचा साखपुडा करण्यात आला होता, तसेच त्याच्या बहिणीला देखील भेटू दिलं नाही. लग्नपत्रिका देण्यासाठी बहीण आणि दाजी आले होते. तरुणींच्या आत्महत्येमागे दीप सिंग यांचा छोटा भाऊ जबाबदार असल्याचे जसवंत सिंह म्हणाले होते.
ADVERTISEMENT











