शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या पोटात बाळ...

crime news : आरोपीने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पीडित तरुणी ही गर्भवती राहिल्याची घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

crime news

crime news

मुंबई तक

• 08:07 PM • 01 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले

point

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या लोणी बॉर्डर पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पीडित तरुणी ही गर्भवती राहिल्याची घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 14 वर्षीय मुलीवर 20 दिवस कुलूपबंद घरात नको तेच.. लाज आणणारा प्रकार

अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 30 मे 2026 रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. शेजारी असलेल्या हमीद शाह यांचा मुलगा सिरजने तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते. या घटनेनंतर पीडित मुलगी ही गर्भवती राहिली होती. प्रकरणाचे गांभीर्य़ लक्षात घेत, पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

सोमवारी लोणी बॉर्डर पोलीस सेवाधाम ते तिला मोड रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना, स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सांगितलं की, थांबण्याऐवजी तरुणाने पळ काढला, त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गोळीबार केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि जीडीएम मैदानावर घेराव घालून थांबवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला कोंडीत पकडल्यानंतर त्याने पुन्हा गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. या गोळीबारात पीडित तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागली, ज्यात तो जखमी झाला. त्याला तात्काळपणे रूग्णालयात नेले. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीची ओळख हमीद शाह पटली. 

हे ही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल

दरम्यान, पोलिसांनी दावा केला, चौकशीदरम्यान आरोपीने अल्पवयीन पीडितेसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंधझ ठेवल्याचा कबुलीनामा दिला होता. तेव्हा घटनास्थळावरून पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक रिकामे काडतूस आणि स्कूटर जप्त करण्यात आली.