Extra marrital affair : एका महिलेनं पुतण्यासाठी आपल्या नवऱ्याला सोडलं आणि नंतर पुतण्याशी विवाह केला. त्यानंतर ते दोघेही बिहार येथील जमुई येथून हैदराबादला गेले. पतीने आपल्या पत्नीला पुतण्यासोबत विवाह करण्यास कसलाही विरोध केला नाही. अशातच आता एका महिलेनं थेट नवऱ्यालाच चॅलेंज दिलं आहे. ती म्हणाली की, मी आता जमुईला येईल आणि माझ्या पुतण्यासोबत राहीन. तो (पती) माझं काहीही एक वाकडं करु शकणार नाही,असे पत्नीने थेट नवऱ्याला ओपन चॅलेंज दिलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आयबी अधिकाऱ्याने बहिणीसह विष पिऊन केली आत्महत्या, बंद खोलीत आढळले मृतदेह, सावत्र आईने...
नेमकं काय घडलं?
पुतण्याचे नाव सचिन असे आहे, तर विवाह करणाऱ्या महिलेचं नाव आयुषी असल्याचे सांगण्यात येत आहे. आयुषीचं म्हणणं आहे की, बघतेच आम्हाला लग्न करण्यापासून कोण रोखेल, मी माझा पती विशालकडे पुन्हा कधीही जाणार नाही. आता पतीला चांगलाच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझ्या नवऱ्याने अनेकदा माझ्याबाबत अफवाह पसरवल्या आहेत. मी सर्व काही सोडून माझ्या नवऱ्याकडे गेले, पण आता मी पुन्हा त्याच्याकडे कधीही जाणार नाही. माझा पती विशालच्या आयुष्यातून देवाने मला बाहेर काढलं, मी त्याच्या आयुष्यात पुन्हा जाणारच नाही.
"मी पहिल्या नवऱ्याकडे अजिबातच जाणार नाही"
पुढे आयुषी म्हणाली की, मी अगदीच वाईट नाहीये. विशालने मला अनेकदा मानसिक त्रास दिला आहे, त्यामुळेच मी दुसरं लग्न केलं आहे. देव त्याला कधीच माफ करणार नाही. मी काही दिवसानंतर माझ्या गावी पुन्हा परतणार आहे. लोकांना असे वाटते की मी विशालसोबत राहते. पण मी जेव्हा गावी जाईल तेव्हा मी सचिनसोबत राहत असल्याचे अनेकांना समजेल.
हेही वाचा : 6 व्या मजल्यावरुन दिला धक्का; फाटलेले कपडे अन्... प्रेयसीला संपवण्यामागे नेमकं कारण काय?
दरम्यान, आयुषीचा पहिला विवाह हा 2021 मध्ये विशाल दुबे नावाच्या तरुणाशी झाला होता. परिवार रजीवनगर येथील रहिवासी आहे. दोघांनाही चार वर्षांची लहान मुलगी आहे. विवाहाच्या दोन वर्षानंतर आयुषीचे पुतण्याशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. 15 जून रोजी आयुषीने आपल्या मुलीचा आणि पतीचा कसलाही विचार न करता सचिनसोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोघेही फरार झाले होते. त्यानंतर विशाल दुबेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस संबंधित प्रकरणाची चौकशी करू लागले आहेत. त्यानंतर शुक्रवारी 20 जून रोजी ग्रामस्थांच्या साक्षीने दोघांचा विवाह करण्यात आला.
संबंधित घटनेची प्रश्न-उत्तरं
प्रश्न 1 : कोणाचं कोणाशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होत?
उत्तर : विशालची पत्नी आयुषीचं पुतण्या सचिनसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर आहे.
प्रश्न 2 : ही घटना कुठे घडली?
उत्तर : ही घटना बिहार येथील जमुई येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
