ज्या फोनवर तीन बहिणी गेम खेळायच्या, तो वडिलांनी विकला; 9 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी शेवटची सर्च हिस्ट्री काय होती?

नवव्या मजल्यावरून तीन सख्या बहिणींनी एकत्र उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. खरं तर, यामागे ही एक गुंतागुंतीची कथा आहे. 3 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे 1 वाजता, घरातील सर्वजण झोपलेले असताना, या तीन बहिणींनी मृत्यूला का कवटाळले?

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:00 AM • 08 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्या फोनवर तीन बहिणी गेम खेळायच्या, तो वडिलांनी विकला

point

9 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी शेवटची सर्च हिस्ट्री काय होती?

Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून तीन सख्या बहिणींनी एकत्र उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. खरं तर, यामागे ही एक गुंतागुंतीची कथा आहे. 3 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे 1 वाजता, घरातील सर्वजण झोपलेले असताना, या तीन बहिणींनी मृत्यूला का कवटाळले? या प्रश्नाचे उत्तर आता त्या दोन मोबाइल फोन्समध्ये शोधलं जात आहे. मुलींचे मोबाईल वडिलांनी घटनेपूर्वी काही दिवस आधी विकले होते. 

हे वाचलं का?

रात्रीची भयानक टाइमलाइन

वडिलांच्या जबाबातून त्या रात्रीची भयानक टाइमलाइन समोर आली आहे. संध्याकाळी 7 वाजता वडिलांनी मुलींकडून फोन हिसकावून घेतला होता. पण रात्री 11 वाजता त्या तिघी पुन्हा आईचा फोन घेऊन खोलीत गेल्या. त्यानंतर, 1 वाजताच्या सुमारास जेव्हा आईने त्यांच्याकडून फोन परत घेतला, तेव्हा मुलींनी हुशारीने अंगावर चादर ओढली आणि झोपण्याचं नाटक करण्यास सुरुवात केली. 

कोणालाही कल्पना नव्हती की बंद खोलीत आत काय शिजत आहे. थोड्याच वेळात जेव्हा आईला संशय आला, तेव्हा दार आतून बंद असल्याचे कळलं. त्यावेळी, वडिलांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एक जोरात आवाज आला आणि तीन्ही बहिणी खाली टिन शेडजवळ रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्या. 

हे ही वाचा: 'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘एक दूजे के लिए’ मधून केला होता डेब्यू

विकलेले मोबाइल आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

पोलिसांची तपासणी आता पूर्णपणे डिजिटल पुराव्यांवर आधारित आहे. मुलांच्या वडिलांनी दोन फोन विकले होते. पहिला फोन सुमारे 6 ते 7 महिने आधी विकला होता. दुसरा फोन घटनेपूर्वी फक्त 10 दिवस आधी विकला गेला. पोलिस आता हे दोन्ही फोन रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर, त्या तिसऱ्या फोनच्या (आईच्या फोनच्या) फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्याचा मुलींनी मरण्यापूर्वी वापर केला होता. त्यांची सर्च हिस्ट्री काय होती? त्या इंटरनेटवर काय शोधत होत्या आणि कोणाशी संपर्कात होत्या का? पोस्टमॉर्टम आणि डायरीचे रहस्य काय आहे? हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. 

मुलींनी त्यांच्या सुसाइड नोटमध्ये 'मार खाण्यापेक्षा मरणं चांगले' असे लिहिले होतं, पोस्टमॉर्टम अहवालानुसार, मृत्यूचे कारण उंचावरून पडल्यामुळे शॉक आणि हेमरेज म्हणजेच रक्तस्त्राव आहे. शरीरावर जुन्या जखमांची कोणत्याही खुणा सापडल्या नाहीत. आता पोलीस त्या डायरीच्या हस्ताक्षराचा तपास करत आहेत. आता सर्व काही त्या मोबाइल फोन्सच्या डिजिटल अहवालावर अवलंबून आहे. 

    follow whatsapp