Beed : मशिदीत जिलेटीनचा स्फोट, मध्यरात्री बीड जिल्हा हादरला, दोघे ताब्यात, घटना नेमकी काय?

मुंबई तक

30 Mar 2025 (अपडेटेड: 30 Mar 2025, 01:51 PM)

Beed Gelatin Blast News : गेवराई तालुक्यातील अर्धा मसाला गावात जिलेटीनच्या कांड्या फोडून  मशिदीत स्फोट घडवून आणण्यात आला. अर्धामसला गावातील मशिदीमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या कांड्या वापरून स्फोट घडवला.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला

point

गेवराईमध्ये मशिदीत जिलेटीनचा स्फोट

point

दोन तरूणांनी स्फोट घडवल्याची माहिती

Beed Georai Ardhamasla Blast :  गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर आहे.त्यातच आता गेवराईमध्ये दोन युवकांनी स्फोट घडवून आणल्याची घटना घडली आहे. मशि‍दीमध्ये झालेल्या स्फोटामुळे बीडमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Nanded : व्हिडीओ कॉलवरुन विद्यार्थीनीचा विनयभंग, पिडितेच्या कुटुंबानं चोप दिल्यानंतर मुख्याध्यापकानं विष प्राशन...

गेवराई तालुक्यातील अर्धा मसाला गावात जिलेटीनच्या कांड्या फोडून  मशिदीत स्फोट घडवून आणण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन युवक पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.  या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेत दोन आरोपींना तात्काळ अटक केली. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

अर्धामसला गावातील मशिदीमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या कांड्या वापरून स्फोट घडवला. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्वतः पोलीस अधीक्षकांनी पहाटेच गाव गाठलं.  पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्याच्या जावेद खान यांना थेट उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले, 'तुम्हाला तर...'

संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तलवाडा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आली. पोलिसांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.