हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्याच्या जावेद खान यांना थेट उद्धव ठाकरेंचा फोन म्हणाले, 'तुम्हाला तर...'
Pune: पुण्यात एका ब्राह्मण व्यक्तीवर अत्यंसंस्कार करून जावेद खान यांनी संपूर्ण समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या याच कृत्य खुद्द उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील येथील जावेद खान यांनी पवित्र रमाजन महिना सुरू असताना एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या घटनेमुळे जावेद खान यांचे सर्वत्र कौतुक होत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या या कृतीबद्दल प्रचंड कौतुक केलं आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी जावेद खान यांना फोन करून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील सुधीर किंकळे या 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा काल (28 मार्च) अचानक मृत्यू झाला. पण यावेळी सुधीर किंकळे यांच्या बहीण जयश्री किंकळे यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न जयश्री यांना पडला. त्याचवेळी याबाबतची माहिती मायकल साठे यांनी जावेद खान या आपल्या मित्राला दिली.
ज्यानंतर जावेद खान यांनी तात्काळ ससून रुग्णालयात जाऊन स्वतः सुधीर किंकळे यांच्या अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली. सुधीर किंकळे हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर सूर्यास्ताआधी अंत्यसंस्कार व्हावेत असं त्यांच्या बहिणीने जावेद खान यांना सांगितलं होतं. त्यावेळी जावेद खान यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या काही मित्रांच्या मदतीने हिंदू रीतिरिवाजानुसार सुधीर किंकळे यांच्यावरीलअत्यंसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.
हे ही वाचा>> Pune : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना
जावदे खान यांनी केलेल्या या कृतीने धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांचे अडथळे तोडून एकतेचा संदेश दिला आहे.










