Nagpur Crime: नागपुर शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे काही अज्ञात लोकांनी मिळून एका 33 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिगारेट ओढण्यावरून वाद झाल्याने पीडित तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी संबंधित तरुणाकडे सिगारेट जळण्यासाठी लायटर मागितलं मात्र, त्या तरुणाने लायटर देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापले आणि त्यामुळे झालेल्या वादातून ही भयानक घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी या न्यूज एजन्सीला या घटनेची माहिती दिली.
ADVERTISEMENT
सिगारेटसाठी लायटर देण्यास नकार अन्...
ही घटना रविवारी संध्याकाळी खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बिना संगम येथे घडली. तसेच, सुशील कुमार गेडाम अशी मृत तरुणाची ओळख असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेडाम आणि त्याचा मित्र आशीष गोंडाने हे स्विमिंग करून तिथून परतत असताना काही 4 ते 5 अज्ञात तरुणांनी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सिगारेट जळवण्यासाठी लायटर मागितलं.
हे ही वाचा: नाशिक : लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीला पाहाताच 36 वर्षीय तरुणातील राक्षस जागा, लाईट बंद केली अन्...
पोलीस आरोपींच्या शोधात...
मात्र, पीडित तरुणांनी त्यांनी सिगारेटसाठी लायटर देण्यास नकार दिला. या कारणामुळे त्यांच्यात वाद झाला. मात्र, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं मारहाणीत रुपांतर झालं. त्यावेळी, आरोपींनी पीडित तरुणांवर दगड आणि चाकूने हल्ला केला आणि तिथून पळून गेले. या हल्ल्यात सुशीलचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र आशीष गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या, मृताच्या मित्राची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: उपसरपंचाने दारात आयुष्य संपवल्यानंतर अटक झाली, पण आता नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन
हत्येचा गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर या घटनेतील आरोपींना अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT











