गोव्यात हत्या, मुंबईत अटक! 22 वर्षीय तरूणीने का घडवलं हत्याकांड?

रोहिणी ठोंबरे

• 01:10 PM • 05 Feb 2024

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतून मामा आणि भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मामाला अटक करण्यात आली आहे.

Goa Murder Case a 22 year old girl planned the murder of 77 year old man murder in goa arrest in Mumbai

Goa Murder Case a 22 year old girl planned the murder of 77 year old man murder in goa arrest in Mumbai

follow google news

Goa 77 Years Old Man Murder Case : गोव्यातील (Goa Crime) 77 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी क्राइम ब्रँचच्या पथकाने 22 वर्षीय तरुणी आणि तिच्या 32 वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 47 लाख 82 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. नरोत्तम ढिल्लोन असे मृत वृद्धाचे नाव आहे. उत्तर गोव्यातील पोर्वरीम येथील बंगल्यात त्याचा मृतदेह सापडला. (Goa Murder Case a 22 year old girl planned the murder of 77 year old man murder in goa arrest in Mumbai)

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधून आरोपींची माहिती दिली आहे. लवकरच त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. आरोपींविरुद्ध गोव्यातील पोर्वरीम पोलीस ठाण्यात खून आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : Lok Sabha : PM मोदींचा जोरदार हल्लाबोल, ‘घराणेशाहीमुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळ…’

गोवा-मुंबई महामार्गावर नंबर प्लेट नसलेली कार मुंबईच्या दिशेने जात असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांना एका फॉर्च्युनर कारमधून दोन जण रस्त्याने येताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

वृद्धाने तरुणीला गोव्याला बोलावले होते

माहितीनुसार हे आरोपी मूळचे भोपाळचे होते. चौकशीत कारमध्ये बसलेल्या तरुणीने सांगितले की, तिची इंस्टाग्रामवर गोव्यात राहणाऱ्या निम्स नावाच्या 77 वर्षीय व्यक्तीसोबत ओळख झाली. निम्सने तिला इन्स्टाग्रामवरच मेसेज करून गोव्यात येऊन बंगल्यात राहण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर ती तिच्या दोन मित्रांसोबत गोव्यात आली.

वाचा : Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार ‘या’ नेत्याला उतरवणार मैदानात?

ते गोव्यात पोहचताच त्यांची भेट नरोत्तम ढिल्लोन यांच्याशी झाली. ते त्यांना फॉर्च्युनर कारमधून त्यांच्या बंगल्यात घेऊन गेले. आरोपी मुलीने दावा केला की निम्सने रात्री तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान त्यांच्यात मारामारी झाली, त्यात निम्सचा मृत्यू झाला.

वाचा : गुंड असिफ दाढी-अजित पवारांच्या भेटीला, ‘त्या’ फोटोमुळे राजकारणात खळबळ

वृद्धाच्या मृत्यूनंतर लूट

वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तरुणी आणि तिच्या दोन मित्रांनी तेथून त्याची फॉर्च्युनर घेऊन पळ काढला. पोलीस पकडतील या भीतीने त्यांचा एक साथीदार आधीच गाडीतून खाली उतरून पळून गेला. तर या दोघांनाही पुढे नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार, वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी मोबाईल, गळ्यातील चेन आणि सोन्याचे ब्रेसलेट घेऊन पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून अंदाजे 47 लाख 82 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आता या प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp