डोक्यात गॅस सिलिंडर घालून बायकोची हत्या, घराला कुलूप लावून पळाला नवरा; नेमकं कारण काय?

किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर नवऱ्याने बायकोच्या डोक्यात सिलिंडर घालून तिची हत्या केली. यानंतर तो घराला कुलूप लावून घरातून पळून गेला. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:11 AM • 30 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

डोक्यात गॅस सिलिंडर घालून बायकोची हत्या

point

घराला कुलूप लावून पळाला नवरा

point

नेमकं कारण काय?

Crime News : एकीकडे देशभरात गॅस सिलिंडरची वानवा असताना सिलिंडरच्या सहाय्याने एक खून झाल्याची घटना समोर आली आहे. एका पतीने घरगुती वादातून आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घातला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आरोपी पतीला गुरुवारी (26 मार्च) पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणातील गुरुग्राम परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

..म्हणून सिलिंडर डोक्यात घातला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील (वय 22 वर्ष) हा मूळचा बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी आहे. त्याने 20 मार्च रोजी एका घरात भाड्याने खोली घेतली होती. तेथे तो आपली पत्नी गुंजनसोबत राहत होता. मात्र, 23 मार्चच्या रात्री दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या सुनीलने घरातील एका लहान गॅस सिलिंडरने गुंजनच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : नवजात बाळाला झुडुपात टाकले, भटक्या कुत्र्‍यांनी लचके तोडत रस्त्यावर आणले; आई-बाप का झाले क्रूर?

शेजाऱ्यांना आला संशय

मंगळवारपासून सुनीलची खोली बाहेरून बंद असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने बुधवारी संध्याकाळी काही जणांनी खिडकीतून आत डोकावले असता, गुंजन रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. घरमालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

हे ही वाचा : रुममध्ये मोठ्याने गाणी लावली अन् चुलत्याने कटर मशीनने कापला तीन पुतण्यांचा गळा, त्याआधी नेमकं काय घडलं?

आरोपीला अटक

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे 26 मार्च रोजी आरोपी सुनीलला गुरुग्राममधूनच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुनीलने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत आणि त्या रात्री देखील रागावर नियंत्रण न राहिल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.