उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मतिमंद महिलेवर बलात्कार, 14 जण दोषी; हादरवून टाकणारं प्रकरण

एका मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीत विभाग प्रमुखासह स्टाफमधील 14 जण दोषी आढळले आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:33 AM • 30 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मतिमंद महिलेवर बलात्कार

point

14 जण दोषी

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आयुर्विज्ञान  विश्वविद्यालयातील मानसिक रोग विभागात ही घटना घडली. याप्रकरणी चौकशीसाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत मानसिक रोग विभागाच्या प्रमुखासह स्टाफमधील 14 जण दोषी आढळले आहेत. 

हे वाचलं का?

पीडिता पाच महिन्यांची गर्भवती 

38 वर्षीय पीडितेला 14 जून 2025 रोजी या विश्वविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यानंतर 17 मार्च 2026 रोजी तपासणी दरम्यान पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळले होते. यानंतर चांगलीच खळबळ माजली होती. दोषींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती.

हे ही वाचा : सोलापूर : अर्ध्या तासात येतो असं सांगून घराबाहेर पडला, चौदा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला जिम ट्रेनरचा मृतदेह

समितीच्या चौकशीत 14 जण दोषी

शनिवारी समितीच्या कार्यपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीने विभागप्रमुख प्रोफेसर ए.के.मिश्रा आणि स्टाफमधील 14 जण दोषी असल्याचे सांगितले. यासोबतच विश्वविद्यालयात सफाई काम करणाऱ्या सन फॅसिलीटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या निष्काळजीपणावरही समितीने ताशेरे ओढले आहेत.  सर्व दोषींविरोधात कारवाई सुरु करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.

हे ही वाचा : बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..

आरोपी आणि पीडितेची डीएनए चाचणी

पीडिता गर्भवती आढळल्यानंतर सुरुवातील रविंद्र कुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी पीडिता आणि आरोपीची डीएनए चाचणी केली. तसेच पीडितेची साक्षदेखील नोंदवली गेली. यानंतर विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली होती.