Hit And Run : विरार येथील अर्नाळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला आणि महिला प्रवासी जागीच मृत पावली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना 22 जानेवारी रोजी सकाळी घडली आहे. कविता नितीन कोलगे (55 वर्षे) असे महिला मृत प्रवाशाचे नाव आहे. या अपघातानंतर बसचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेला. या संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?
नेमकं काय घडलं?
रिक्षाचालक पूनम वरठा या तीन प्रवासी महिलांना घेऊन जात होत्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटीसमोर विरुद्ध दिशेने आलेल्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षाच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या रिक्षातून प्रवास करणारी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
यावेळी एसटी बस ड्रायव्हर राजू गांगुर्डे हा घटनास्थळावरून पळून गेला. संबंधित प्रकरणात रिक्षाचालक पूनम वरठा यांनी दिलेल्या तक्रारीत फरार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : महिलेला घरी जाण्यासाठी पतीनं बुक केली कॅब, ड्रायव्हरने दोन प्रवाशांना गाडीत घेतलं, मुंबईत 'त्या' रात्री महिलेसोबत..
पनवेलमध्ये पुणे पोर्शेची पुनरावृत्ती
दरम्यान, अशीच अपघाताची घटना पनवेलमध्ये घडली आहे. बड्या बापाच्या लेकीनं मर्सडीझ बेंझने एका दुचाकीला धडक दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री 8 : 45 वाजता खारघरच्या हिरानंदानी येथे घडली आहे. या अपघातात दुचाकीवर बसलेले पती-पत्नी हवेत उडून रस्त्यावर आदळले. या अपघातात रेखा यादव (वय 50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे पती गोपाल यादव (वय 54) हे अपघातात जबर जखमी झाले आहेत. पती गोपाल यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील खोलवर तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
