नवऱ्याने बायकोला कोंबडा बनवलं, अन् शेवटी नको ते केलं... मुंबईत 'ही' भलतीच घटना

Mumbai Crime News Update: चेंबूरमध्ये पतीनं पत्नीला तब्बल चार तास 'कोंबडा' बनवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या आरोपी अरबाज याने असा विचित्र प्रकार नेमका का केला?

husband forces wife to assume rooster position attacks her with a knife police arrest accused arbaz

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: AI

मुंबई तक

• 09:51 PM • 01 Jun 2026

follow google news

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्याचं दिसतं आहे. नात्यांमध्ये विश्वास आणि माणसांमध्ये संयम राहिला नसल्याच दिसून येईल अशीच एक घटना काल उजेड्यात आली आहे. नवऱ्याने बायकोला आधी कोंबडा बनवलं आणि नंतर बेदम मारहाण केली. या घटनेतील आरोपीबद्दल नंतर माहिती उघड झाली आणि नाव ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला. आता तो आरोपी कोण आहे ही घटना कुठे घडली आणि बायकोने असं काय केलं की नवऱ्याने तिला चार तास कोंबडा बनवून ठेवलं? या सगळ्या घटनेबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

नवरा-बायको मधील वाद नवे नाहीत, दोघांमधील वादाला कारण लागतं असंही नाही. मात्र काही घटना धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असतात. पतीकडून अमानुष छळ केला जात असल्याचं अनेक घटनांमधून आपल्या समोर आल्या आहेत. मुंबईतील चेंबूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला तब्बल 4 तास कोंबडा बनवून बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा>> शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या पोटात बाळ...

अरबाज अनवर अली सय्यद असं आरोपीचं नाव आहे. अरबाजच्या व्यसनामुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दोघांमध्येही वाद व्हायचे. या प्रकाराला वैतागून अरबाजची बायको माहेरी निघून गेली होती. माहेरी गेलेल्या पत्नीला शॉपिंग करून देण्याच्या अरबाजने दिला घरी आणलं. जीन्स, अत्तरची बाटली खरेदी करून देतो म्हणून सांगितलं आणि घरी आणताच अरबाजन रंग बदलला. 

बायकोला घरात डांबून ठेवलं, क्रूर अरबाज एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बायकोला एक-दोन नव्हे तर तब्बल 4 तास कोंबडा बनवून ठेवलं. तसंच तिला पट्ट्याने मारहाण केली आणि तलवारीने कापून टाकण्याची आणि तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली. हा अमानुष छळ बायकोला सहन होत नव्हता. रात्री नऊच्या सुमारास पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका केली आणि ती थेट आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली.

हे ही वाचा>> 12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली, दोघांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवत जंगलात...

पत्नी माहेरी गेल्याच लक्षात येताच अरबाजचा राग अनावर झाला. अरबाजन थेट बायकोच माहेर गाठलं तिच्या वडिलांशी, भावाशी हुज्जत घालू लागला. पत्नी घरातून पळून आल्याच्या रागात मारहाण करत त्याने थेट चाकूने हल्ला केला. लोक पत्नीच्या मदतीला येतील म्हणून अरबाजन लोकांनाही धमकावलं. लोकांच्या दिशेने हातामधील चाकू हवेत भिरकावला आणि भीतीपोटी परिसरातील लोकही पळून गेले. 

शेवटी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अरबाजला ताब्यात घेतलं. महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अरबाजला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सगळी कुंडली बाहेर आली. अरबाज हा सराईत गुन्हेगार आहे. अरबाजवर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत. 

दारू, गांजा पिऊन अरबाज परिसरात राडे करायचा अशी माहिती सुद्धा आता समोर आली आहे. अरबाजला डिसेंबर 2025 पासून 12 महिन्यांकरता हद्दपार करण्यात आलं आहे. तडीपार असतानाही आदेशाचे उल्लंघन करून बकरी ईदच्या दिवशी चेंबूर भागात तो आला. त्याने कपडे आणि इतर खरेदी करण्याच्या बहाण्यानं पत्नीला विजयनगर भागात बोलवून घेतलं तिथूनच या सगळ्या नव्या राड्याला सुरुवात झाली. 

मुंबईत गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईतल्याच पवईमध्ये दोन दिवसांपूर्वी दूध मागितलं म्हणून अवघ्या चार वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा त्याच्या वडिलांनी जीव घेतल्याची घटना घडली आहे. गौतम नगर परिसरात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपी राजेश सिंहाला दारूचं व्यसन असून तो कोणतंही काम करत नव्हता. मुलाने जेव्हा त्याच्याकडे दूध मागितलं आणि वेळेवर दूध मिळालं नाही त्यामुळे तो रडू लागला. याच गोष्टीचा राग आल्याने राजेशने आपल्या मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. 

रागाच्या भरातच वडिलांनी मुलाला उचलून दरवाजावर आपटलं. ज्यामुळे त्या चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि या डोक्याला लागलेल्या दुखापतीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं. म्हणजे वरील या दोन्ही घटना बारकाईने पाहिल्या तर व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे घरातील माणसं एकमेकांच्या जीवावर उठतात आणि हो त्याचं नव्हतं होतं.