हनिमूनला गेलेल्या कपलसोबत काय घडलं, पतीची हत्या.. पत्नी बेपत्ता; ही मर्डर मिस्ट्री तुमचं डोकंच टाकेल चक्रावून!

मुंबई तक

• 07:56 PM • 06 Jun 2025

Husband Dead And Wife Missing Honeymoon Tragedy : पती पत्नी हनिमूनसाठी इंदौरहून मेघालयला जातात. पण मेघालयमध्ये पोहोचल्यावर 48 तासानंतर अचानक दोघेही गायब होतात.

Honeymoon Murder Case Viral News

Honeymoon Murder Case Viral News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जंगलात पती-पत्नीसोबत नेमकं काय घडलं?

point

राजा आणि सोनमसोबत नेमकं घडलं तरी काय?

point

थरारक मर्डर मिस्ट्रीबाबत जाणून घ्या

Husband Dead And Wife Missing Honeymoon Tragedy : पती पत्नी हनिमूनसाठी इंदौरहून मेघालयला जातात. पण मेघालयमध्ये पोहोचल्यावर 48 तासानंतर अचानक दोघेही गायब होतात. दोघांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ येत होते. आता त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचा भाऊ मेघालयमध्ये पोहोचतो. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर तेथील पोलीस एक सर्च ऑपरेशन सुरु करतात. इंदौरमध्ये लग्न झालं, मेघालयमध्ये हनिमून आणि शिलाँगमध्ये हत्या..काय आहे या थरारक घटनेची मिस्ट्री, जाणून घ्या.

हे वाचलं का?

राजा आणि सोनमसोबत नेमकं घडलं तरी काय?

इंदौर येथील राजा रघुवंशी यांचं लग्न 11 मे रोजी सोनमसोबत झालं होतं. लग्नाच्या नऊ दिवसानंतर हे दाम्पत्य हनिमूनसाठी इंदौरहून गुवाहाटीला जातात. दोघेही 20 मे रोजी सायंकाळी गुवाहाटीला पोहचात. तेथे कामाख्या मंदिरात दर्शन घेऊन 22 मे ला दोघेही शिलाँगला जातात. शिलाँगला पोहचताच दोन दिवसानंतर पती-पत्नी अचानक गायब होतात..पण कुटुंबियांनी  दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा आसामला जाण्याचा प्लॅन होता. पण दोघेही शिलाँगला कसे पोहोचले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा >> सैराट.. आईने पोटच्या पोरीचं मुंडकं छाटलं, भावांनी धड केलं वेगळं अन्..

रिपोर्टनुसार, राजा आणि सोनमचा पत्ता न लागल्याने या दोघांचे कुटुंबीय इंदौरहून शिलाँगला पोहोचले. त्यानंतर त्यांनी सोहना पोलीस स्टेशनमध्ये दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे शिलाँगचे काही फोटो या दोघांनी कुटुंबियांसोबत शेअर केले होते. यामध्ये एका फोटोत एक स्कूटी असल्याचं समोर आलं. या स्कूटीवर एक फोन नंबरही होता. या नंबरवर फोन केल्यावर समजलं की, स्कूटी भाड्याने चालवायला देण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी मेघालय पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

तपासात असं समोर आलं आहे की, राजा आणि सोनम 22 मे रोजी शिलाँगच्या मवालाखियत परिसरात गेले होते. त्या ठिकाणी शिपारा येथे त्यांनी स्टे केला  होता. या परिसरातच असलेल्या जंगलात पोलिसांना दोन बॅग सापडल्या. या बॅग राजा आणि सोनमच्याच होत्या. पण विजाडोंग पार्किंग लॉटच्या जवळ असलेल्या दरीत सर्च ऑपरेशन सुरु होतं. त्याचदरम्यान पोलिसांना एक मृतदेह आढळला.

हे ही वाचा >> मामीचे भाच्यासोबत अनैतिक संबंध, मंजूचा मजनू झालेल्या आकाशने मामासोबतच केला कांड!

या ठिकाणी लेडिज व्हाईट शर्ट, पेंट्रा 40 टॅबलेटचं पॉकेट आणि मोबाईल फोनची एक कव्हर सापडली. तसच मृतदेहाच्या अंगावर एक घड्याळही सापडला. मृतजदेह सापडताच पोलिसांनी राजा आणि सोनमच्या कुटुंबियांना सांगितलं. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचा शोध सुरु होता. पण सोनमबाबत कोणतीही ठोस माहिती सापडली नाही. राजाचा मृत्यू कसा झाला आणि सोनम कुठे बेपत्ता झाली? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिलाँग पोलिसांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.