निष्पाप मुलीला फूस लावून खोलीत नेलं... 10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार! रडत रडत घरी आली अन्...

एका गावातील 10 वर्षांच्या मुलीला तिच्या घरातून बाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार!

10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार!

मुंबई तक

• 10:00 AM • 21 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार!

point

पीडितेने कुटुंबियांना सगळंच सांगितलं...

Rape Case: सध्या, देशात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहारच्या मुजफ्फरपुर येथे अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुझफ्फरपूरच्या सदर पोलीस स्टेशन परिसरात येणाऱ्या एका गावातील 10 वर्षांच्या मुलीला तिच्या घरातून बाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

पीडित मुलीला त्यांच्या खोलीत नेलं अन्... 

एफआयआरमध्ये सकरा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आफताब आणि वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर परिसरातील रहिवासी शिवनाथ यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी प्रीतच्या घराशेजारी भाड्याच्या घरात राहत असून ते शिक्षण घेत होते. त्यांनी त्या अल्पवयीन पीडित मुलीला त्यांच्या खोलीत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट

आक्षेपार्ह अवस्थेत घरी पोहोचली  

घटनेनंतर संबंधित पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत घरी परतली. तिने तिच्या कुटुंबियांना तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या घटनेची माहिती सांगितली. नंतर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना कळवलं. संबंधित अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तिच्यावर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला असून या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एक पथक तयार करून दोन्ही आरोपींना अटक केली. वैद्यकीय तपासणी आणि न्यायालयात नोंदवलेला जबाब यासह पुढील कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा: Govt Job: 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची नवी संधी... काय आहे अर्जाची शेवटची तारीख?

मुलीला फूस लावून पळवून नेलं 

तक्रारीच्या अर्जात, आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं मुलीच्या आईने म्हटलं. त्यानंतर, दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी बराच वेळ घरी परतली नसल्यामुळे कुटुंबियांनी पीडितेची चिंता वाटू लागली. त्यानंतर आरोपींनी तिला घराजवळ आणून तिथेच सोडलं. नंतर पीडितेच्या कुटुंबियांना आपल्या मुलीकडून घटनेची माहिती मिळाली. यानंतर, मुलीच्या आईने सदर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

    follow whatsapp