विम्याचे 53 लाख हडपण्यासाठी भाऊजीनेच मेहुण्याला संपवलं, सिनेमासारखाच रचला डाव, दुचाकी अपघातानंतर...

Jalgaon Parola Crime News: जळगाव पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. एका दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर आलेली कहाणी हादरवून टाकणारी होती.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Apr 2025 (अपडेटेड: 30 Apr 2025, 03:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी दुचाकी अपघात दाखवला, नंतर बिंग फुटलं

point

जळगावमधील पारोळ्यातली थरारक घटना

point

भाऊजीनेच कसा काढला मेहुण्याचा काटा

Jalgaon Parola Crime News : राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडणं सुरूच आहेत. अशातच आता जळगावातील पारोळा तालुक्यात 53 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका कापूस व्यापारी असणाऱ्या भाऊजीने सख्ख्या मेहुण्याचा खून केल्याची काळीज हेलावून टकणारी घटना घडली आहे. याप्रकरणात आता पारोळा पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या दाजीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे वाचलं का?

काय होतं एकूण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. एका दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. समाधान शिवाजी पाटील असे संबंधित मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घडलेल्या घटनेमागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. 

हे ही वाचा >> रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना एक दुचाकी आढळली. मात्र, ती दुचाकी सुस्थितीत होती. यानंतर पोलिसांनी याबाबत समाधानची आई आणि बहिणीशी संवाद साधत माहिती मिळवली. त्यानंतर संबंधित प्रकरणाची एकूण माहिती सापडली. समाधान पाटील याला दुचाकी चालवता येत नव्हती. तसेच तो अपंग असल्याचेही समोर आले. यानंतर आता पोलिसांनी आपले सूत्र फिरवत नेमकं काय घडलं याचा शोध घेतला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

समाधानचा अपघात नाही तर खून

या घटनेत समाधान यांचा खून झाल्याचे तपासातून समोर आले. हा खून त्याच्या दाजीने म्हणजेच संदीप भालचंद्र पाटील याने केल्याचे एकूण तपासातून समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आरोपी संदीप पाटील आणि चंद्रदीप पाटील यांनी समाधानला एका दुचाकीवर बसवून धुळे-जळगाव रोडवर नेण्यात आले. त्यानंतर हा अपघात झाला असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

हे ही वाचा >> सासू आधी जावयासोबत पळून गेली, आता म्हणतेय मला माझा नवराच हवा.. नेमकं प्रकरण काय?

समाधान पाटील हा अशिक्षित आणि बेरोजगार होता. त्याचे नाव एलआयसीच्या तीन आणि इतर खासगी कंपन्यांच्या दोन अशा एकूण 25 लाख रुपयांच्या विमा पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. ही रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संदीप पाटील यांनी त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 

पारोळा पोलिसांनी केवळ दहा दिवसांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी संदीप भालचंद्र पाटील आणि चंद्रदीप आधार पाचील या दोन आरोपींना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

    follow whatsapp