लाखाचे कोटी करुन देतो म्हणत फसवणूक, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर सापडली, कवटी, दोरे...

मुंबई तक

20 Jun 2025 (अपडेटेड: 20 Jun 2025, 08:11 AM)

किशोर शेवाळे यांनी पोलिसांना सांगितलं की, आरोपीने त्यांच्याकडून 3 लाख रुपये आणि त्यांच्या भाच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. एक लाख रुपये एक कोटीत बदलण्याचं आमिष दाखवलं. पण नंतर, कोट्यवधि तर मिळालेच नाही, पण दिलेले पैसेही मिळाले नाही.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालन्यामध्ये धक्कादायक प्रकार

point

लाखाचे कोटी करून देतो म्हणत अनेकांना गंडवलं

point

पोलिसांनी छापा टाकल्यालवर घरात काय सापडलं?

जालना : राज्यात अजूनही अनेक ठिकाणी जादूटोण्याचे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीयेत. अशातच जालन्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जालना तालुका पोलिसांनी जादूटोण्याच्या नावाखाली एक लाख रुपये एक कोटीत बदलण्याचं आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे.  रतन आसराम लांडगे असं अटकेतल्या आरोपीचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील पेरजपूर गावातील किशोर शेवाळे यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>आरारारारा! मुंबईला मुसळधार पाऊस पुन्हा झोडपणार; कोणत्या ठिकाणी पाऊस घालणार धुमाकूळ? वाचा सविस्तर

किशोर शेवाळे यांनी पोलिसांना सांगितलं की, आरोपीने त्यांच्याकडून 3 लाख रुपये आणि त्यांच्या भाच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. एक लाख रुपये एक कोटीत बदलण्याचं आमिष दाखवलं. पण नंतर, कोट्यवधि तर मिळालेच नाही, पण दिलेले पैसेही मिळाले नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचा संशय आल्यानं शेवाळे यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जालना येथील भक्तेश्वर नगरात आरोपीच्या घरावर छापा टाकला. छापेमारीत पोलिसांना प्लास्टिकची मानवी कवटी, काळ्या रंगाची बाहुली, भालूचा काळा मुखवटा, नोटांसारखे कापलेल्या कागदांच्या गोण्या (त्यापैकी एका गोणीत प्रत्येक बंडलवर 500 रुपयांची एक नोट चिकटवलेली 16 बंडल), लोखंडी पिंजरा, लाकडी विणा इत्यादी साहित्य जप्त केलं. याची किंमत सुमारे 1 लाख 49 हजार रुपये आहे.

हे ही वाचा >>आरारारारा! मुंबईला मुसळधार पाऊस पुन्हा झोडपणार; कोणत्या ठिकाणी पाऊस घालणार धुमाकूळ? वाचा सविस्तर

याशिवाय, आरोपी रतन लांडगे एक लाख रुपये तीन कोटीत बदलण्याचं आमिष देऊन आणखी तीन जणांची फसवणूक करत असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी सर्व जादूटोण्याचे साहित्य जप्त केले असून, आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. जालना तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.